Onion Market Agrowon
ताज्या बातम्या

Onion Subsidy : पाऊण लाख शेतकऱ्यांचे कांदा अनुदानासाठी अर्ज

कांद्याला दर नसल्याने अनुदान देण्यात येणार असल्याने अनुदान मिळावे यासाठी नगर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७५ हजार ३२५ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.

Team Agrowon

Nagar News : कांद्याला दर नसल्याने अनुदान (Onion Subsidy) देण्यात येणार असल्याने अनुदान मिळावे यासाठी नगर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७५ हजार ३२५ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठीची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये कांद्याला दर नसल्याने शासन प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देणार आहे. एका शेतकऱ्याला २०० क्विंटलच्या मर्यादित म्हणजे जास्तीत जास्त ७० हजार रुपये अनुदान दिले जाईल. अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी बाजार समिती, खासगी बाजार समिती, नाफेड खरेदी केंद्र आदी ठिकाणची कांदा विक्री ग्राह्य धरण्यात येत आहे.

‘‘आतापर्यंत नगर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७५ हजार ३२५ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. नगर बाजार समितीतून सर्वाधिक सुमारे ३२ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. पारनेर, राहुरीतूनही बऱ्यापैकी अर्ज आले आहेत’’, असे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यातील तालुकानिहाय अर्ज

नगर : ३१,२९०

राहुरी: ६,३३२

राहता : १,३४३

संगमनेर : ७,३०४

अकोले : ४०३

कोपरगाव : ५,५५७

श्रीरामपूर : १,३९७

नेवासा : ५,८४८

शेवगाव : १,८३१

पाथर्डी : ३००

जामखेड : ४,६९०

कर्जत : १,४०४

श्रीगोंदा : १,२५८

पारनेर : ६,३६५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, ३४४ कोटी निधी मंजूर

Bamboo Farming: बदलत्या हवामानात बांबू शेती उत्तम पर्याय

Enzyme Technology: एन्झाइम तंत्राने कृषी अवशेषांचे मूल्यवर्धन

Cooperative Society Elections: राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित; जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक संस्थांवर परिणाम

Poultry Farm Equipment: कुक्कुटपालनासाठी आवश्यक उपकरणे

SCROLL FOR NEXT