Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Electricity Connection : महावितरणच्या बारामती परिमंडळांत दोन दिवसांत ६९३ वीज जोडण्या

Mahavitaran News : बारामती परिमंडळात मागील ५० दिवसांत पैसे भरल्यापासून अवघ्या २४ तासांत ६१०, तर ४८ तासांत ६९३ वीजजोडण्या देण्याचे काम वीज कर्मचाऱ्यांनी केले आहे.

Team Agrowon

Baramati News : महावितरण कंपनीकडून ग्राहकसेवा गतिमान करण्यावर विशेष भर दिला आहे. बारामती परिमंडळात मागील ५० दिवसांत पैसे भरल्यापासून अवघ्या २४ तासांत ६१०, तर ४८ तासांत ६९३ वीजजोडण्या देण्याचे काम वीज कर्मचाऱ्यांनी केले आहे. हे काम महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

विजेच्या विविध सेवांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने कृती मानके ठरवून दिली असून, प्रत्येक सेवेसाठी कालमर्यादा निश्‍चित केली आहे. ग्राहकांना वेळेत व नियमितपणे वीजजोडण्या दिल्या, तर वीजचोरी कमी होऊन कंपनीच्या महसुलात भर पडेल.

तसेच ग्राहक व कंपनीतील संबंध अधिक दृढ होतील यासाठी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी २४ ते ४८ तासांत जोडण्या देण्याचे निर्देश सर्व क्षेत्रीय अभियंत्यांना दिले आहेत. या कामी संचालन विभागाचे संचालक संजय ताकसांडे व प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी युद्धपातळीवर अंमलबजावणी केली आहे.

बारामती परिमंडळात मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली १ जुलै ते ९ ऑगस्ट या ५० दिवसांत १३०३ वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यातील ६१० वीजजोडण्या २४ तासांत, तर ६९३ जोडण्या ४८ तासांत दिले आहेत.

दररोज या कामांचा वेग वाढतच चालला आहे. चालू महिन्यात आतापर्यंत १९७ जोडण्या देण्याचे काम झाले आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादी शून्याकडे जात आहे. वीज ग्राहकांनीही या जलद सुविधांचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाचा व मोबाइल ॲपचा वापर करून विविध वीज सेवांचा ऑनलाइन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT