Pune APMC Election
Pune APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

Pune APMC Election : पुणे बाजार समितीसाठी ६७.८२ टक्के मतदान

Team Agrowon

Pune News तब्बल २० वर्षांनंतर होत असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Pune APMC Election) निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान झाले. दुपारी चार वाजेपर्यंत सुमारे ६७.८२ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसातही मतदान (Voting) सुरू झाले होते.

शुक्रवार पेठेतील शिवाजी मराठा संस्थेच्या मतदान केंद्रावर बनावट मतदानाच्या किरकोळ आरोपानंतर झालेला गोंधळ वगळता मतदान सुरळीत पार पडले. दरम्यान, गोंधळाच्या परिस्थितीवर पोलिस प्रशासन आणि निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी नियंत्रण मिळवीत प्रक्रिया सुरळीत पार पाडली. आज शनिवारी (ता. २९) मतमोजणी होणार आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २० वर्षांनी होत असल्याने आणि या काळात बदललेल्या राजकीय पिढ्या आणि समीकरणांमुळे निवडणुकीत रंगत आणली होती. बाजार समितीवर नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.

काँग्रेसचे माजी नेते आणि सध्या भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे बाजार समितीवर वर्चस्व कायम राहिले आहे. मात्र २० वर्षांनतंरच्या राजकीय उलथापाथीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

या निवडणुकीसाठी भाजपाने निवडणूक थेट न लढविता राष्ट्रवादी काँग्रेसधून नाराज नेत्यांना आयात करून मोट बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नांना विशेष सूर गवसला नसल्याचे चित्र होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल आणि भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय आयात नेत्यांच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

शुक्रवारी (ता. २८) झालेल्या मतदानात व्यापारी आणि अडते मतदार संघासाठी शुक्रवार पेठेतील शिवाजी मराठा शिक्षण संस्थेमध्ये मतदान होते. या ठिकाणी सर्वाधिक १३ हजार १७४ मतदान होते.

यामुळे या ठिकाणी सकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या मतदान केंद्रावर बनावट मतदार मतदान करीत असल्याचा आरोप उमेदवार अमोल घुले, विलास भुजबळ, सौरभ कुंजीर यांनी करत, मतदानावर आक्षेप घेतला.

या वेळी काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या वेळी पोलिस बळाचा वापर करून गर्दी पांगविण्यात आली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप आणि पोलिस प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवून प्रक्रिया सुरळीत पार पाडली. इतर हमाल मापाडी, सेवा संस्था आणि ग्रामपंचायत मतदान केंद्रावर सुरळीत मतदान पार पडले.

आज मतमोजणी

शुक्रवारी (ता. २८) सुरळीत झालेल्या मतदानानंतर शनिवारी (ता. २९) महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून, दुपारी चारनंतर निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पुणे बाजार समितीची निवडणूक २० वर्षांनंतर होत असल्याने काही जणांनी जुन्या मतदार यादीचा वापर केल्याने संभ्रम निर्माण झाला होता. तर काही उमेदवारांनी बनावट मतदान झाल्याच्या तोंडी तक्रारी केल्या. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. याबाबत लेखी तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र एकही लेखी तक्रार प्राप्त झालेली नसून, लेखी तक्रारीवर कायदेशीर कारवाई केली असती. बोगस मतदानाच्या आरोपांबाबत कोणतेही तथ्य नव्हते.
- प्रकाश जगताप, निवडणूक निर्णय अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांदा पुन्हा गडगडला

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

LokSabha Election : मावळात मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार?

Loksabha Election 2024 : अकरा मतदार संघांतील उमेदवारांचे भवितव्य ‘बंद’

PDKV Seed Research Centre : ‘पंदेकृवि’चे बियाणे संशोधन केंद्र ठरले राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट

SCROLL FOR NEXT