Koyna Dam Satara Agrowon
ताज्या बातम्या

Koyna Dam Satara : कोयना धरण भरण्यासाठी अद्यापही ६६ टीएमसी पाण्याची आवश्यकता

Team Agrowon

Satara Rain : सातारा जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने कोयना धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. दरम्यान काल रात्रीपासून धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणांतर्गत विभागातून प्रतिसेकंद सरासरी ५८ हजार ५९१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. दरम्यान मागच्या ४८ तासांत कोयना धरणात १० टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

धरणात एकूण उपलब्ध पाणीसाठा ३९.०९ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा ३४.०९ टीएमसी इतका झाला आहे. चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात ५.०६ टीएमसीने तर पाणी उंचीत ८ फूट ८ इंच वाढ झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान होत असलेल्या पावसाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. यामुळे कराड, सांगली याभागातील नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे.

१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या उपयुक्त साठा ३४.०९ टीएमसी इतका तर धरणाची जळपातळी ६३७.७९४ मीटर झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप ६६.१६ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

मागच्या चोवीस तासातील कोयनेत १३२ मि.मी. नवजामध्ये १८७ मि.मी. तर महाबळेश्वर २१६ मि.मी. तर मागच्या ५० दिवसांता कोयनेत १६०४ मि.मी.१६०४, नवजा २२६२ मि.मी., महाबळेश्वर २२६७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, हवामान खात्याने चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला. पार्श्वभूमिवर प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी रात्रभर कोयनानगर येथे ठाण मांडून होते. रात्री उशिरा प्रशासनाने काडोली येथील पुलाची पाहणी केली. सलग दोन दिवस मुसळधार पावसामुळे विस्कळित झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT