Farmer  Agrowon
ताज्या बातम्या

Money Lending : सावकारांच्या दारात ६६ हजार कर्जदार

Money Lenders : शेतीसह व्यवसायासाठी व इतर कामांसाठी लागणाऱ्या भांडवलासाठी जिल्ह्यातील ६६ हजार ४०७ जणांनी खासगी सावकारांचे दार ठोठावले आहे.

Team Agrowon

Amravati News : शेतीसह व्यवसायासाठी व इतर कामांसाठी लागणाऱ्या भांडवलासाठी जिल्ह्यातील ६६ हजार ४०७ जणांनी खासगी सावकारांचे दार ठोठावले आहे. या कर्जदारांना सावकारांकडून ४६.६० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. यामध्ये बिगर कृषी कर्ज घेणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. बिगर तारण ठेवणाऱ्या कर्जदारांची संख्या १४६२ इतकी आहे.

जिल्ह्यातील चौदा तालुक्यांत ५८८ परवानाधारक सावकार आहेत. त्यांनी बिगर कृषी कर्ज वितरित केले आहे. शेतीच्या मशागतीसह व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलासाठी कर्जदारांनी स्वतःजवळील मालमत्ता गहाण (तारण) ठेवून कर्ज घेतले आहे.

या कर्जदारांकडून प्रतिवर्षी १५ टक्के, तर बिगर तारण कर्ज घेणाऱ्या कर्जदारांकडून १८ टक्के व्याज घेण्याची मुभा आहे. यापेक्षा अधिक व्याज आकारल्यास फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे. आरोप सिद्ध झाल्यास पाच वर्षे कारावासाची तरतूद कायद्यात आहे.

जिल्ह्यातील ६६ हजार ४०७ कर्जदारांनी आर्थिक गरजेपायी खासगी सावकारांकडून व्याजाने कर्ज घेतले आहे. तारण देत कर्ज घेणाऱ्यांची संख्या ६४ हजार ९४५ आहे. त्यांना ४६.२६ कोटी रुपये कर्ज देण्यात आले आहे. तर बिगर तारण कर्जदार १४६२ आहेत. त्यांना ३३.१८ लाख रुपयांचे कर्ज दिले गेले आहे.

अनेकांच्या शेती तारण

कृषी कर्ज घेण्यात आले नसल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने म्हटले असले, तरी अनेकांच्या शेती कर्जासाठी सावकारांकडे तारण आहेत, हे वास्तव आहे. त्याची नोंद उपनिबंधक कार्यालयाकडे नाही. सावकाराकडून देण्यात आलेल्या माहितीतही त्याचा उल्लेख नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

सावकारांनी दिलेल्या कर्जाची स्थिती

परवानाधारक सावकार : ५८८

एकूण कर्जदार : ६६,४०७

कर्जवाटप : ४६.६० कोटी रुपये

तारण कर्जदार : ६४,९४५

कर्ज रक्कम : ४६.२६ कोटी रुपये

बिगर तारण कर्जदार : १४६२

कर्ज रक्कम : ३३.१८ लाख

तालुकानिहाय सावकारांची संख्या

अमरावती : २२९, भातकुली : ९, मोर्शी : ३२, अंजनगावसुर्जी : २३, धामणगावरेल्वे : २४, वरुड : ३३, अचलपूर : १३२, धारणी : १६, नांदगाव खंडेश्‍वर : १२, चांदूररेल्वे : ९, चांदूरबाजार : ३८, तिवसा : १८, दर्यापूर : १३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

ICAR Wheat DBW : आयसीएआरने विकसित केलेल्या गव्हाच्या सहा वाणांवर पंजाब कृषी विद्यापीठाचा आक्षेप; आयसीएआरचा दावा काय?

Bihar Election 2025: बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न! खात्यात १० हजार, १० व्यांदा नितीश कुमार; लाडक्या बहिणींनी NDAला तारलं

Chickpea Sowing: हरभरा पेरणी अनेक भागांत पूर्ण

Cooperative Sector Opportunity: सहकार क्षेत्रामध्ये चांगली संधी

Local Body Elections: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा नगर परिषद, एका नगरपंचायतसाठी होणार निवडणूक

SCROLL FOR NEXT