Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Crop Loan : रब्बीचे ६६ टक्के पीककर्ज वाटप

परभणी जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात विविध बँकांना ६२४ कोटी ८० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले.

Team Agrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यात यावर्षीच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात (Rabi Season 2023) ता. १५ जानेवारी अखेर पर्यंत एकूण ५२ हजार ६९२ शेतकऱ्यांना ४१४ कोटी ४५ लाख रुपये (६६.३३ टक्के) पीककर्ज (Crop Loan) वाटप झाले आहे.

गतवर्षी (२०२१-२२) च्या या तारखेला एकूण ३६ हजार ५९८ शेतकऱ्यांना २६१ कोटी ४९ लाख रुपये पीककर्ज वाटप झाले होते.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीचे १५२ कोटी ९६ रुपये एवढे जास्त पीककर्ज वाटप झाले (Rabi Crop Loan) आहे. भारतीय स्टेट (SBI Bank Crop Loan) बँकेने उद्दिष्टापेक्षा जास्त पीककर्ज वाटप केले आहे.

परभणी जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात विविध बँकांना ६२४ कोटी ८० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले.

त्यात राष्ट्रीयकृत बँकांना (Nationalized Banks) ३६१ कोटी ७३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ८६ कोटी ९५ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १२९ कोटी १८ लाख रुपये, खासगी बँकांच्या ४६ कोटी ९४ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.

१५ जानेवारी अखेर राष्ट्रीयकृत बँकांनी २७ हजार ४२४ शेतकऱ्यांना २६६ कोटी ३१लाख रुपये (७३.६२ टक्के) पीककर्ज वाटप केले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४ हजार ६५९ शेतकऱ्यांना ४३ कोटी ४४ लाख रुपये (४९.९६ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९ हजार ७४२ शेतकऱ्यांना ९२ कोटी ३ लाख रुपये (७१.२४ टक्के), खासगी बँकांनी ८६७ शेतकऱ्यांना १२ कोटी ६७ लाख रुपये (२६.९९ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

आजवरच्या कर्ज वाटपात ४७ हजार ३०९ शेतकऱ्यांनी ३५५ कोटी ५६ लाख रुपये एवढ्या रकमेच्या पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे.

तर एकूण ५ हजार ३८३शेतकऱ्यांना ५९ कोटी ९ लाख रुपये नवीन पीककर्ज वाटप करण्यात आले. पीककर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँका आघाडीवर आहेत.

जिल्हा सहकारी बँक दुसऱ्या क्रमांकावर त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक,खासगी बँका असा क्रम आहे.

रब्बी पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये) ३१ डिसेंबरपर्यंत

बँक - उद्दिष्ट - वाटप रक्कम - शेतकरी संख्या - टक्केवारी

भारतीय स्टेट बँक- २३१.५८ - २३७.९५ - २४८३३ - १०२.७५

महाराष्ट्र ग्रामीण बँक - ८६.९५ - ४३.४४ - ४६५९ - ४९.९६

जि.म.सहकारी बँक - १२९.१८ - ९२.०३ - १९७४२- ७१.२४

बँक ऑफ बडोदा - २६.६९ - ६.५७- ७११ - २४.६२

बँक ऑफ इंडिया - ४.८० - १.१७ - ९५ - २४.३८

बँक ऑफ महाराष्ट्र - ३२.७६ - १४१७ - ११२९ - ४३.२५

कॅनरा बँक - १९.१९ - २.६१ - २८१ - १३.६०

सेंट्रल बँक ऑफ इंडिया- ४.९० - ०.५५ - ६१ - ११.२२

इंडियन बँक - ९.७८ - १.५० - १३७ - १५.३४

इंडियन ओव्हरसीज बँक - ४.२१ - ०.६३ - ४९ - १४.९६

पंजाब नॅशनल बँक - ४.३९ ०.८०- ७३ - १८.२२

युको बँक - ९.५८ - ०.१३- १२ - १.३६

युनियन बँक ऑफ इंडिया- १३.८५ - ०.२३ २७५ - १.६६

अॅक्सिस बँक - ५.०७ - ०.६१ - १४ - १२.०३

एचडीएफसी बँक - १५.४७ - २.५३ - १२९ - १६.३५

आयसीआयसी बँक - १२.२४ - ८.५८ - ५६९ - ७०.१०

आयडीबीआय बँक - १४.१६ - ०.९५ - १५५ - ६.७१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT