Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : बुलडाणा जिल्ह्यात ६३ टक्के पेरण्या

Kharif Season 2023 : पाऊस कमी झाल्याने यंदा जुलैमध्ये पेरण्यांना सुरुवात झाली. त्यातही पाऊस भाग बदलून येत असल्याने पेरण्यांना सार्वत्रीकपणा आला नव्हता.

Team Agrowon

Buldana News : र पावसाची अनियमितता कायम टिकून राहिली. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक पावसानंतर जिल्ह्यात पेरण्यांनी एकच गती पकडली आहे. जिल्ह्यातील लागवड आता ६५ टक्क्‍यांवर पोहोचली आहे.

पाऊस कमी झाल्याने यंदा जुलैमध्ये पेरण्यांना सुरुवात झाली. त्यातही पाऊस भाग बदलून येत असल्याने पेरण्यांना सार्वत्रीकपणा आला नव्हता.

बुधवारी (ता.१२) जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला. त्यानंतर पेरणीला सार्वत्रिक स्वरूप आले. दोन दिवसांत पेरणीची आकडेवारी कमालीची बदलली. गुरुवार (ता. १३) अखेर जिल्ह्यात ६३ टक्के पेरणी पूर्ण झाली.

जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र ७ लाख ३५ हजार ५२१ हेक्टर असून, आतापर्यंत चार लाख ६३ हजार हेक्टरवर पेरणी आटोपल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी दिली.

जिल्ह्यात मका ७७४१ हेक्टर, तूर ४३९३६, मूग ३९४१, उडीद ३९९९, सोयाबीन २ लाख ७३ हजार ५८६ हेक्टर, तर कपाशीची १ लाख २९ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी आटोपली. जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरीच्या ७० टक्के क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT