Radhanagari Dam Agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Rain : ‘राधानगरी’च्या तीन दरवाजांतून ५८८४ क्युसेकने विसर्ग सुरू

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात शनिवारी (ता. १०) सायंकाळपासून संततधार पाऊस (Continuous Rain) सुरू असल्याने राधानगरी धरणाचे (Radhanagari Dam) तीन दरवाजे उघडले. रविवारी (ता. ११) दुपारी १:३५ वाजता स्वयंचलित द्वार क्रमांक ३ उघडले आहे. तीन दरवाजांतून क्युसेक ४२८४, तर पॉवर हाउसमधून १६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग (Water Discharge From Dam) सुरू आहे.

कसबा बावडा येथील राजाराम बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. संततधार पावसामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणीपातळी १७ फुटांवर गेली आहे. बंधाऱ्यावरून यातूनच धोकादायकरीत्या वाहतूक सुरू आहे.

तुळशी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून तुळशी धरणातून सध्या असणारा ५०० क्युसेक विसर्ग ३०० ने वाढ करून ८०० क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे तुळशी नदीकाठच्या लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, पश्‍चिम भागात चांगला पाऊस असल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ही वाढत आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने विभागाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भोगावती पर्यायाने पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढणार असल्याने आणखी काही बंधारे येत्या दोन दिवसांत पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील दोन बंधारे पाण्याखाली

दरम्यान, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्याने रुई आणि इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे. पाटगाव, कुंभी धरण शंभर टक्के भरले आहे. पावसाचा जोर वाढल्याने पाटगाव आणि कुंभी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. जिल्ह्यातील तुळशी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे आणि कोदे धरण १०० टक्के भरली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss Compensation : अतिवृष्टी नुकसानीचे २२ कोटी ३३ लाख अनुदान

Crop Damage Compensation : पीक नुकसानीचे अनुदान आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर

APMC Election : आमदारकीच्या इच्छुकांची बाजार समितीत कसोटी

Soybean Crop Damage : अतिवृष्टीमुळे काढणी केलेल सोयाबीन पाण्यात

Rural Development : गट-तट विसरून गावे आदर्श करा

SCROLL FOR NEXT