Sugarcane Crushing Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : पुणे जिल्ह्यातील ५७ लाख टन उसाचे गाळप

पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण १५ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू असून, आतापर्यंत ५७ लाख २० हजार ७३ टन उसाचे गाळप झाले आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण १५ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम (Sugarcane Season) वेगाने सुरू असून, आतापर्यंत ५७ लाख २० हजार ७३ टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing) झाले आहे. त्यातून ५२ लाख २९ हजार ४४८ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा सरासरी ९.१४ टक्के एवढा आहे.

जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच दणका दिला होता. साखर कारखान्याच्या गळीत हंगामात काही प्रमाणात अडचणी आल्या होत्या. अनेक ठिकाणी उसामध्ये पाणी साचल्याने ऊसतोड बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे बहुतांश साखर कारखान्याचा गळीत हंगाम धीम्या गतीने सुरू होता. मात्र आता गळीत हंगाम चांगलाच सुरू असून, मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात उसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. उशिराने झालेल्या पावसामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टरहून अधिक उसाच्या लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे सव्वा लाख हेक्टरवरील ऊस उपलब्ध आहे. शासनाने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात १६ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू झाले आहे. जिल्ह्यात जवळपास १८ साखर कारखाने आहेत. त्यापैकी

१५ कारखान्यांनी गाळपासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये सहकारी नऊ व खासगी सहा साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख एक हजार ७५० टन एवढी आहे.

बारामती ॲग्रोची आघाडी

आतापर्यंत झालेल्या गाळपामध्ये बारामती अॅग्रोने सर्वाधिक आघाडी घेतली आहे. या कारखान्याने आठ लाख तीन हजार ६० टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून सहा लाख ३१ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर साखर उतारा सरासरी ७.८६ टक्के एवढा आहे.

सोमेश्‍वरनगर (बारामती) येथील श्री सोमेश्‍वर सहकारी साखर कारखाना व अवसरी (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. या दोन्ही कारखान्यांचा १०.६४ टक्के एवढा साखर उतारा आहे. दौंडमधील अनुराज साखर कारखान्याने सर्वांत कमी गाळप केले आहे. आतापर्यंत एक लाख ७० हजार ८६० टन एवढे गाळप केले. तर एक लाख ७२ हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून साखर उतारा सरासरी १०.०८ टक्के एवढा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bank Note Exchange: जिल्हा बँकांच्या नोटाबदलीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडून

PM DhanDhanaya Yojana: ‘पीएम धनधान्य कृषी योजने’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Maize Production: जागतिक पातळीवर विक्रमी मका उत्पादन?

Maharashtra Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT