50 years of rainfall records in Shegaon Market Committee Agrowon
ताज्या बातम्या

Shegaon Rain Records : शेगाव बाजार समितीत ५० वर्षांच्या पाऊस नोंदी

समाजमाध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते माहिती

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
बुलडाणा ः जिल्ह्यातील शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने (Shegaon Market Committee) पडणाऱ्या पावसाच्या सुमारे ५० वर्षांच्या नोंदी (Rain Records) जपल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे पर्जन्यमापक यंत्राद्वारे शेगाव शहरात पडणाऱ्या पावसाचे मोजमाप केले जाते. पडलेल्या पावसाचा दैनंदिन अहवाल तालुक्यातील शेतकऱ्यांना समाजमाध्यमांतून पाठवितात. शेतकऱ्यांपर्यंत पावसाची माहिती रोज पोहोचवून या बाजार समितीने शेतकऱ्यांमध्ये एक वेगळे स्थान तयार केले आहे.

बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक पांडुरंगदादा पाटील व कर्मचारी पावसाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवितात. बाजार समितीने घेतलेल्या नोंदीनुसार यंदा पावसाळ्यात १६ सप्टेंबरपर्यंत ९३८.०४ मिलिमीटर म्हणजेच ३७.१९ इंच पाऊस झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पावसाच्या नोंदीची गेल्या ५० वर्षांतील तारीखवार माहिती उपलब्ध आहे. ही माहिती पूर्वी नियमितपणे बाजार समितीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जात होती. आताही ही माहिती लिहिली जाते. १९७० च्या दशकात शेगाव बाजार समितीचे कार्यालय हे शासनाचे ‘रेनगेस्ट स्टेशन’ होते. यासाठी बाजार समितीने एका कर्मचाऱ्याकडे जबाबदारी सोपवली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर यांनी दिली. बाजार समितीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Government Relief: शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार?

Grape Farming: अतिवृष्टीच्या संकटातही द्राक्ष पिकातून आशेचा गोडवा

Animal FMD Disease: राज्य ‘लाळ्या खुरकूत’ मुक्तीच्या दिशेने

Honest Trader: ज्वारीच्या पोत्यात आलेले सोने केले परत

Crop Insurance: पीकविमा परतावा खात्यात जमा होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT