Tree Plantation Agrowon
ताज्या बातम्या

Mazi Vasundhara : माझी वसुंधरा अभियानात सिंदखेडला ५० लाखांचे बक्षीस

महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांतर्गत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान राज्यात राबवत आहे.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा ः महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल (Climate Chnage) विभागांतर्गत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान (Mazi Vasundhara Abhiyan) राज्यात राबवत आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत ग्रामपंचायत गटामध्ये अमरावती विभागात सिंदखेड ग्रामपंचायत प्रथम आली असून, ५० लाखांचे बक्षिस जाहीर झाले आहे.

या अभियानाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून सुरुवात झाली आहे. माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १६ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत राबविण्यात आले होते. माझी वसुंधरा अभियान २.० मध्ये राज्यातील ४०६ नागरी स्थानिक स्थानिक संस्था व व ११५६२ ग्रामपंचायती सहभागी होत्या.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत निर्मित करण्यात आलेल्या टूलकिटनुसार डेस्कटॉप असेसमेंटसाठी अमृत शहरांसाठी सहा हजार गुण होते. तर इतर नगर परिषद, नगरपंचायत व मागील वर्षात सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींसाठी ५५००, तर दहा हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी पाच हजार ५० गुण ठेवण्यात आले होते. माझी वसुंधरा अभियानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामांचे मूल्यमापन व फिल्ड असेसमेंट त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आले. त्यातून सिंदखेड ग्रामपंचायतीची निवड झाली आहे.

राज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक, तसेच जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार आणि संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये पुरस्कार मिळालेल्या सिंदखेड या गावाने आता माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत भाग घेतला. गावाने एकीच्या बळावर अमरावती विभागातून प्रथम क्रमांक मिळवला असून, या पुरस्काराची रक्कम ५० लाख रुपये इतकी आहे. या निधीचा उपयोग गावाला पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक समृद्ध करण्यासाठी वापरण्यात येईल. बुलडाणा जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाची लोक चळवळ निर्माण व्हावी यासाठी सिंदखेड ग्रामस्थांचा खारीचा वाटा राहील.

- प्रवीण (अप्पा) कदम, सरपंच, सिंदखेड, तालुका मोताळा, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT