महारुद्र मंगनाळे
सहा वर्षांपूर्वी सलग दोन वर्षे विविध प्रकारची झाडं लावली. रोपं विकत आणायची आणि मळ्यात, घराभोवती दिसेल त्या मोकळ्या जागेत लावायची.या वृक्षारोपणाचं कौतूक असं की,मी लावलेली झाडं शंभर टक्के जगली.
कोणतं झाडं नेमकं किती वाढेल याचा अंदाज नव्हता.त्यामुळं काही ठिकाणी झाडांची खूप गर्दी झाली.
गेल्या महिन्यात गुलमोहराची तीन मोठी झाड मुळापासून काढली.कारण त्यांच्या खालच्या वीस-बावीस झाडांची वाढ खुंटली होती.
रुद्रा हटची पूर्व बाजु विविध वेलींनी व करंज झाडांनी झाकोळून गेली होती.त्यातून उन्हाच्या तिरीप यायच्या पण सुर्यदर्शनच दूर्लभ झालं होतं.मला तर ऊनही तेवढंच प्रिय आहे.आज शेवटी सगळ्या वेली बुडातून कट केल्या. करंजच्या दोन मोठ्या फांद्या तोडल्या..आता बाहेरच्या शेडमधून सूर्य दिसेल.