Gram Panchayat Election
Gram Panchayat Election Agrowon
ताज्या बातम्या

Gram Panchayat Election : सरपंचपदासाठी ४६१ उमेदवार रिंगणात

Team Agrowon

नांदेड : थेट सरपंचपदासह ग्रामपंचायत (Gram Panchayat ) सदस्यत्वासाठी भाग्य आजमावणाऱ्यांचे १८ डिसेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीत चित्र स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढती होणार असल्याचे दिसून येत आहे. माघार घेतल्यानंतर सरपंचाच्या १८१ पदांसाठी ४६१ तर सदस्यांच्या एक हजार ३९१ जागांसाठी दोन हजार ६२० उमेदवार रिंगणात आहेत.

नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सदस्य व सरपंच पदांसाठी प्राप्त अर्जाची छाननी सोमवारी रात्री उशिरापर्यंत करण्यात आली. त्यानंतर बुधवारी उमेदवारी अर्ज दुपारी तीनपर्यंत मागे घेता आले. याच दिवशी दुपारी तीन वाजेनंतर निवडणूक चिन्हांचेही वाटप करण्यात आले आहे.

मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत करता येणार असून, मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे. जिल्ह्यातील १६ ही तालुक्यांत सरपंचपदासाठी छाननीनंतर ७१९ उमेदवारांचे अर्ज शिल्लक होते. त्यापैकी २५९ जणांनी माघार घेतली आहे. सदस्यपदासाठी छाननीनंतर शिल्लक राहिलेल्या तीन हजार २७७ सदस्यांपैकी ६५४ जणांनी माघार घेतली. त्यामुळे दोन हजार ६२० उमेदवार रिंगणात राहिले.

पाच सरपंच ४९ सदस्यांचे अर्ज अवैध

जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतीसाठी उमेदवारांच्या अर्जांची छाननी बुधवारी करण्यात आली. त्यात सरपंचपदासाठीचे पाच तर सदस्य पदासाठीचे ४९ अर्ज विविध कारणास्तव अवैध ठरले आहेत.

तालुकानिहाय जागांची संख्या

तालुका सरपंच जागा सदस्य जागा

नांदेड सात ६१

अर्धापूर दोन १६

भोकर तीन २१

मुदखेड एक सात

हदगाव सहा ४८

हिमायतनगर एक सात

किनवट ५३ ४०३

माहूर २७ २०५

धर्माबाद तीन २३

उमरी एक सात

बिलोली नऊ ६७

नायगाव आठ ६६

मुखेड १५ १११

कंधार १६ १२२

लोहा २८ २२०

देगलूर एक सात

एकूण १८१ १३९१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT