Sugarcane Harvesting Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Harvester : यंत्राद्वारे ऊसतोड केल्यास साडेचार टक्के वजावट

यंदाच्या ऊस गळीत हंगामासाठी तोडणी यंत्राद्वारे ऊसतोड केल्यास साडेचार टक्के पाचट वजावट करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.

टीम ॲग्रोवन

मुंबई : यंदाच्या ऊस गळीत हंगामासाठी (Sugarcane Season) तोडणी यंत्राद्वारे ऊसतोड (Sugarcane Harvesting By Harvester Machine) केल्यास साडेचार टक्के पाचट वजावट करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. यंत्राच्या सदोष तोडणीमुळे उसात पाचट (Crop Residue) राहत असल्याचा निष्कर्ष अभ्यास गटाने काढला आहे. त्यामुळे यंत्राच्या दोषामुळे आणि चालकाच्या सदोष पद्धतीमुळे शेतकऱ्याला फटका बसणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून ऊसतोडणी मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना आणि साखर कारखान्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यावर उपाय म्हणून तोडणी यंत्राद्वारे ऊसतोडणीचा पर्याय समोर आला. मात्र यंत्राद्वारे तोडणीमुळे शेतकऱ्याचे नुकसान होते, शिवाय कारखानदार मनमानी पद्धतीने पाचट वजावट करतात. त्यामुळे पाचट वजावट किती निश्चित करावी यासाठी पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ सुभाष घोडके यांच्या अध्यक्षतेखाली १४ जणांची समिती नेमण्यात आली होती.

या समितीने १३ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात १५ ठिकाणची पाहणी केली. यामध्ये खोडवा, पूर्वहंगामी, आडसाली उसाच्या तोडणीचा अभ्यास केला. यामध्ये तोडणी यंत्राद्वारे ऊसतोडणी केल्यास काही ठिकाणी २. ३७ टक्के, तर काही ठिकाणी १३.३० टक्के पाचट उसाबरोबर जात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

मोठ्या प्रमाणात पाचट राहण्याचे मुख्य कारण हे यंत्रातील सदोष यंत्रणा. जमिनीमध्ये ओलावा असेल तर मुळासहीत उसाचे खोडवे येणे, वाडे नीट न कापणे, चालकाला यंत्राचा नीट वापर न करता येणे आदी बाबींमुळे पाचट जास्त प्रमाणात राहत असल्याचा निष्कर्ष अभ्यासगटाने काढला आहे.

तज्ज्ञांचा, संघटनांचा विरोध

साडेचार टक्के पाचट वजावटीला शेतकरी संघटना आणि तज्ज्ञांचा विरोध आहे. याआधी साखर कारखाने पाच टक्के वजावट करत होते. मात्र ही वजावट दोन टक्के असायला हवी. एकप्रकारे सरकारने साखर कारखान्यांच्या बाजूने निर्णय घेत साडेचार टक्के वजावटीला मान्यता दिली आहे.

अभ्यासगटाचे निष्कर्ष

- ऊसतोडणी यंत्राचे ब्लेड जुने असणे

- उसाचे वाडे कापणी टॉपर न वापरणे

- ब्लोअर व्यवस्थित न चालविणे

- तोडणी यंत्र वेगाने चालविल्याने पाचट जास्त राहते.

- यंत्र चालकाने कापणीसाठी निश्चित केलेल्या मानांकनाप्रमाणे यंत्र न चालविणे.

- जमिनीत ओलावा असणे.

- हार्वेस्टरचा ब्लोअर व्यवस्थित न चालविणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Buffalo Meat Exports : म्हशीचे मांस, दुग्धजन्य आणि कुक्कुट उत्पादनांची निर्यात वाढली; जागतिक बाजारपेठेत मागणी

Manoj Jarange Patil Ends Hunger Strike: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे, सरकारला दिली तीन महिन्यांची मुदत, कोणत्या मागण्या मान्य केल्या?

POCRA Two Project: ‘पोकरा दोन’साठी चौपट अर्ज वाढवा

Crop Loss Inspection: पिकांची स्थिती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी थेट शेतात

Bhokardan Farmer Protest: शेतकऱ्यांनी सुकलेली सोयाबीन, मका तहसीलदारांना दिली भेट

SCROLL FOR NEXT