Sugarcane Crushing Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : सांगली जिल्ह्यात ३९ लाख टन उसाचे गाळप

सध्या जिल्ह्याचा निम्मा हंगाम संपत आला आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत १० सहकारी आणि तीन खासगी कारखाने सुरू आहेत. त्यामुळे या १३ कारखान्यांनी आपली क्षमता वाढवत जिल्ह्यातील सर्व ऊस तोडण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.

Team Agrowon

सांगली : जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) सुरू होऊन अडीच ते तीन महिने झाले. सध्याच्या स्थितीत ३८ लाख ३२ हजार ५५८ टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing) करण्यात आले असून ४० लाख ९८ हजार १९७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या हंगामात जिल्ह्यात ९३ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यामुळे सध्या जिल्ह्याचा निम्मा हंगाम संपत आला आहे.

जिल्ह्यात सद्यःस्थितीत १० सहकारी आणि तीन खासगी कारखाने सुरू आहेत. त्यामुळे या १३ कारखान्यांनी आपली क्षमता वाढवत जिल्ह्यातील सर्व ऊस तोडण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, सीमाभागातील काही कारखान्यांनी आता जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणात ओढला आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी ६० हजार टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप सुरू झाले आहे.

जिल्ह्यातील ऊस तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आतापर्यंत ३८ लाख ३२ हजार टन उसाची तोड होऊन त्यातून ४० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे सर्व कारखाने याच वेगाने सुरू राहिले तर मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व ऊस तुटेल.

जिल्ह्यात एक लाख ३७ हजार ५८४ हेक्टरवरील ऊस वेळेत तोडण्याचे आवाहन आहे. कृष्णा आणि वारणा नदीला बारमाही पाणी असणाऱ्या तालुक्यात उसाचे आगार होते. परंतु सध्या परिस्थिती बदलत आहे. टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांखालील क्षेत्रही मोठ्या प्रमाणात पाण्याखाली आले आहे.

दर आणि ‘एफआरपी’चा मुद्दा संपला

उसाचा हंगाम सुरू होत असताना शिराळा येथील दालमिया व सांगलीतील दत्त कारखान्याने (वसंतदादा) दराची कोंडी फोडत एकरकमी दर जाहीर केला. पण त्यानंतर मात्र इतर कोणत्याही कारखान्यांकडून दर जाहीर झाला नाही.

त्यामुळे शेतकरी संघटना व शेतकरी आक्रमक झाले होते. त्यांनी आंदोलन पुकारले होते. त्यानंतर जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी एकरकमी दर जाहीर केला आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरही जमा होऊ लागली. त्यामुळे दर आणि ‘एफआरपी’चा मुद्दा संपला असून शेतकरी आपला ऊस कारखान्याकडे कसा जाईल यासाठी प्रयत्नशील आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT