Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : परभणी जिल्ह्यात खरिपाची ३८.७० टक्के पेरणी

Kharif Season 2023 : यंदाच्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता. ७) पर्यंत ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी २ लाख ७ हजार ३० हेक्टरवर (३८.७० टक्के) पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता. ७) पर्यंत ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी २ लाख ७ हजार ३० हेक्टरवर (३८.७० टक्के) पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीला प्राधान्य दिल्यामुळे आजवरच्या पेरणीमध्ये सर्वाधिक क्षेत्र १ लाख ५ हजार हेक्टर लागवड क्षेत्र एकट्या कपाशीचे आहे.

पुरेशा ओलाव्याअभावी सोयाबीन, तूर, मुग, उडीद, ज्वारी बाजरीच्या पेरणी रखडल्या आहेत. जून महिना कोरडा गेल्यामुळे पेरण्या रखडलेल्या आहेत. जुलै महिन्यातील सुरवातीचे तीन चार दिवस अनेक मंडलात झालेल्या जोरदार पावसानंतर खरिपाच्या पेरण्यांनी वेग घेतला. शुक्रवार (ता. ७) अखेर जिल्ह्यात सोयाबीनची २ लाख ४९ हजार ७२७ पैकी ९१ हजार २४८ हेक्टरवर (३६.५४ टक्के) पेरणी झाली.

कपाशीची १ लाख ९२ हजार २१३ पैकी १ लाख ५ हजार ११५ (५४.६९ टक्के) झाली आहे. तुरीची ४५ हजार ९५९ पैकी ७ हजार ५४ हेक्टर (१६.४२टक्के), मुगाची २७ हजार १७८ पैकी २ हजार २२२ हेक्टर (८.१८ टक्के), उडदाची ९ हजार ८० पैकी २६० हेक्टरवर (२.८६ टक्के ) पेरणी झाली.

एकूण कडधान्याची ८२ हजार ३७५ पैकी १० हजार ३० हेक्टरवर (१२.१८टक्के) पेरणी झाली.ज्वारीची ७ हजार ३३३ पैकी ४६० हेक्टर (६.२७ टक्के), बाजरीची १ हजार १६७ पैकी ४९ हेक्टर (४.२० टक्के), मक्याची १ हजार ३ पैकी १२८ हेक्टर (१२.७५ टक्के) पेरणी झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे जमिनीत पेरणीयोग्य ओलावा नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक मंडलातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी आदी पिकांच्या पेरण्या रखडलेल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT