Shindkheda Funds Agrowon
ताज्या बातम्या

Shindkheda Funds : शिंदखेड्याला ३४ कोटी निधी

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शिंदखेडा तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ३४ कोटींचा निधी मंजूर झाला.

Team Agrowon

धुळे : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शिंदखेडा तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ३४ कोटींचा निधी मंजूर झाला असून, यात रस्ते, दोंडाईचा- शिंदखेडा येथे विश्रामगृह, मंडलाधिकारी व तलाठी कार्यालय आदी कामे होणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी दिली.

ते म्हणाले, की दोंडाईचा शहरातील जुना शहादा रस्त्याचे काँक्रिटीकरण व काँक्रीट गटारीसाठी ८ कोटींचा निधी, तावखेडा- दाऊळ रस्ता सुधारणा करणे व दाऊळ गावांतर्गत मुख्य रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी दोन कोटींचा निधी, रामी फाटा ते मालपूर रस्ता मजबुतीकरणासह सुधारणा करण्यासाठी एक कोटी ५० लाखांचा निधी, मेथी- भडणे रस्यावरील भडणे गावांतर्गत काँक्रिटीकरण करण्यासाठी एक कोटी रुपये, झोतवाडे ते दाऊळ या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी एक कोटी रुपये, शिंदखेडा येथे शासकीय विश्रामगृह इमारतीचे बांधकाम करण्यासाठी एक कोटी ४७ लाख, शिंदखेडा तालुक्यातील दहा मंडलाधिकारी कार्यालयांसाठी चार कोटींचा निधी, तर शिंदखेडा तालुक्यातील ५० तलाठी कार्यालयांसाठी १४ कोटी ९९ लाखांचा निधी, असा एकूण ३३ कोटी ९६ लाखांच्या निधीची तरतूद झाली आहे.

विकासाची गाडी सुसाट

राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदखेडा मतदार संघात विविध विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होत असून, महाविकास आघाडीच्या काळात थांबलेला विकासाचा अनुशेष या उर्वरित कार्यकाळात भरून निघणार आहे. सत्ता बदलानंतर नगरोत्थान योजनेअंतर्गत पाच कोटींचा निधी, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी, पाणंद रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी, वॉटर ग्रीड योजनेसाठी निधी मतदारसंघात आला आहे. त्यामुळे मतदारसंघात विकासाची गाडी सुसाट धावत असल्याचे आमदार रावल यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT