Ayush Prasad Agrowon
ताज्या बातम्या

अंगणवाडीतील ३ लाख मुलांची होणार आरोग्य तपासणी

जिल्हा परिषदेचा उपक्रम, कोथळे येथील अंगणवाडीचे उद्घाटन

टीम ॲग्रोवन

सासवड, जि. पुणे ः पुणे जिल्हा कुपोषणमुक्त (Malnutrition Free) करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या (Pune ZP) माध्यमातून अंगणवाडीमधील ३ लाख २८ हजार मुलांची आरोग्य तपासणी (Health Checkup) करण्यात येणार आहे. या तपासणीनंतर आजारी असणाऱ्या मुलांवर तातडीने उपचार करून त्यांना सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

कोथळे ( ता. पुरंदर ) येथे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रकाश भोईटे यांच्या विशेष प्रयत्नातून येथील भोसलेमळा अंगणवाडीचे उद्घाटन, तसेच स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ६ लक्ष रुपये खर्चाचे रमाई विपीन मंदिर भूमिपूजन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

प्रसाद म्हणाले, ‘‘३ ते ६ वयोगटातील लहान बालकांना शिक्षण देणाऱ्या अंगणवाड्यांद्वारे शिक्षण आणि कुपोषण मुक्तीचे काम केले जाते. जिल्ह्यात ३ लाख २८ हजार मुले अंगणवाडीत शिक्षण घेत आहेत. यापैकी ३ लाख ११ हजार जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. ४५० मुलांच्या तपासणीत सिद्ध झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जे आजार पालकांना माहीत नाही, ते आजार या तपासणीतून समोर आलेले आहेत.’’

या वेळी पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश भोईटे, भाजप पुरंदर तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे, पुरंदरचे गट विकास अधिकारी अमर माने, पुणे रोहयो फळबाग लागवड समिती सदस्य राहुल भोसले, सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय भोईटे, सरपंच अंकिता काळाणे,उपसरपंच वंदनाताई जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप जगताप आणि आभार तुषार काकडे यांनी मानले.

लहान मुलांच्या ३६ आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत. यात औषध, शस्त्रक्रिया, जो उपचार विदेशातही करण्याची सुविधा आहे. तोसद्धा उपचार केला जाणार आहे.
आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Alert: मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Rain Crop Damage: पावसामुळे १४९० हेक्टरला फटका

Milk Regulation: उत्पादक, विक्रेत्यांना नोंदणी बंधनकारक

Unseasonal Rain Impact: पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

SCROLL FOR NEXT