Satbara Nondi  Agrowon
ताज्या बातम्या

Satbara Nondi : सातबारांवरील कालबाह्य २६ हजार ८०० नोंदी काढल्या

जळगाव जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना खरेदी- विक्री, कर्ज घेणे शक्य

Team Agrowon

जळगाव : जिल्ह्यात शेतकऱ्यांसह अनेक नागरिकांच्या सात-बारा (Satbara) उताऱ्यांवर अनेक कालबाह्य नोंदी अनेक वर्षांपासून होत्या. त्या काढण्यासाठी मागील वर्षात महसूल विभागाने (Revenue Department ) विशेष मोहीमच राबविली. त्यात एकूण ३२ हजार २५८ नोंदी शोधण्यात आल्या.

त्यातील २६ हजार ८०० कालबाह्य नोंदी काढून त्या कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतीची खरेदी- विक्री करणे, कर्ज घेणे आदी प्रक्रिया सुलभ होणार आहे.

अनावश्‍यक नोंदी काढण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वी संबंधितांकडे अर्ज करावे लागत होते. सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील फेरफार नोंदी जसे, की तगाई बोजे, बंडिंग बोजे, सावकारांची नावे व बोजे, रद्द झालेल्या भूसंपादनाच्या नोंदी, आयटक बोजे,

अस्तित्वात नसलेल्या संस्था अथवा सोसायटीच्या बोज्यांच्या नोंदी कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत नाशिक महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी निर्देश दिले होते.

त्यानुसार महसूल विभागाने २०२२ मध्ये मोहीम राबविली. जळगाव जिल्ह्यात एकूण १२ लाख १७ हजार ५८८ एवढे सात-बारा उतारे आहेत.

त्यापैकी ३२ हजार ९७४ एवढ्या सात-बारा उताऱ्यांवरील इतर अधिकारात तगाई, बंडिंग, सावकारी बोजे, नजरगहाण नोंदी शोधण्यात आल्या. २६ हजार ८०० कालबाह्य नोंदी सात-बारा उताऱ्यांवरून कमी केल्या आहेत.

सातबारा उताऱ्यावर कालबाह्य नोंदी अनेक वर्षांपासून होत्या. शेतजमिनीचे व्यवहार करताना या नोंदीची पडताळणी करण्यासाठी कालावधी लागत होता.

आता कालबाह्य नोंदी कमी झाल्याने शेतकऱ्यांना खरेदी, विक्रीचे व्यवहार सुलभरीत्या करता येतील.

- शुभांगी भारदे, उपजिल्हाधिकारी, महसूल, जळगाव

सातबारावरील कालबाह्य नोंदी स्थिती

तालुका कालबाह्य नोंदी

जळगाव १५२४

भडगाव १६०८

पाचोरा २३६६

चाळीसगाव २१३४

पारोळा ११९४

एरंडोल ५४९१

धरणगाव ९४६२

अमळनेर १८२९

चोपडा १३८०

यावल १०१२

भुसावळ २९८

बोदवड २२९

जामनेर २३५६

मुक्ताईनगर ५७६

रावेर ७९९

एकूण ३२२५८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Reservoir Storage : देशातील जलशयात पाणीसाठ्यात झपाट्याने घट; राज्यात प्रमुख जलशयात ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Power Tiller Care: पॉवर टिलरची देखभाल कशी करावी?

Kannad Naksha Project: कन्नड नक्शा प्रकल्पाचे काम पूर्ण

Maize Prices Crash: मक्याचा दर हमीभावाच्या खाली, तेलंगणातील शेतकरी अडचणीत, सरकारकडे मदतीची मागणी

Fertilizer Supply: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी २ लाख ९२ हजार टन खत पुरवठा मंजूर

SCROLL FOR NEXT