Sugar Cane FRP
Sugar Cane FRP Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane FRP : ‘किसन वीर’ ची २५०० पहिली उचल

Team Agrowon

सातारा : भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना (Sugar factory) व किसन वीर-खंडाळा कारखान्याकडे गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळपाकरिता येणाऱ्या उसास प्रतिटन २ हजार ५०० रुपये एवढी पहिली उचल (Sugar Cane FRP) देण्यात येणार असल्याची माहिती, कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

प्रसिद्धीपत्रकात आमदर पाटील यांनी म्हटले आहे, की काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील दैनिकामध्ये ‘किसन वीर’ची पहिली उचल प्रतिटन २ हजार ३५० रुपये प्रसिद्ध करण्यात आली होती. या वृत्तामुळे ‘किसन वीर’ व खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे किसन वीर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे येणाऱ्या उसाला प्रतिटन २ हजार ५०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय झाला आहे.

तसेच किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे गळीताकरिता आलेल्या ऊसबिलाच्या पहिल्या पंधरवड्याचे बिल लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली. गळीत हंगामाच्या अखेरीस एफआरपीनुसार जो अंतिम दर निघेल त्यानुसारच किसन वीर कारखान्याचा अंतिम दर राहणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nagpur Ratnagiri Highway : महाविकास आघाडीने केलेला कायदा शेतकऱ्यांच्या तोट्याचा, महामार्गाचे काम रखडलं

Python Rearing : वेगवान, उच्च प्रथिनयुक्त मांस उत्पादनासाठी अजगरपालन!

Onion Export Issue : मोंदीच्या दौऱ्याआधी लासलगावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

Food Labeling Standards : लेबलिंग मानकांचे महत्त्व

Fertilizing Crop Method : पिकांना खत देण्याच्या विविध पद्धती

SCROLL FOR NEXT