Ravikant Tupkar Agrowon
ताज्या बातम्या

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांसह २५ जणांची अकोला कारागृहात रवानगी

पीकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढीसाठी मुद्द्यांवर शनिवारी (ता. ११) आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या रविकांत तुपकरांसह २५ कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.

Team Agrowon

Ravikant Tupkar Arrest बुलडाणा ः पीकविमा (Crop Insurance), अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढीसाठी (Cotton Soybean Rate) मुद्द्यांवर शनिवारी (ता. ११) आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या रविकांत तुपकरांसह (Ravikant Tupkar) २५ कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.

रविवारी (ता. १२) न्यायालयाने या सर्वांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, बुलडाणा कारागृहात जागा नसल्याच्या कारणाने या सर्वांना अकोला कारागृहात पाठवण्यात आले आहे.

शनिवारी झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी कठोर कारवाईचे आधीच संकेत दिले होते. आंदोलन करू नये यासाठी नोटीस बजावली होती.

तरीही शेतकऱ्यांनी हे आंदोलन केल्याने पोलिसांनी सरकारी कामात हस्तक्षेप, पोलिस गणवेश घालून आंदोलन करीत फसवणूक करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान, चिथावणी देणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले.

या सर्वांना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली. दरम्यान शनिवारी झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अटक केलेले तुपकर व कार्यकर्त्यांना चिखली पोलिस ठाण्याच्या कस्टडीत ठेवण्यात आले होते.

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आणि महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी तुपकरांनी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलन सुरू असताना पोलिसांनी अचानक लाठीमार सुरू केल्याने परिस्थिती चिघळली होती.

त्यानंतर पोलिसांनी लोकप्रतिनिधींनाही तुपकरांची भेट घेण्यास मज्जाव केला. पत्रकारांनाही ठाण्यात येण्यास मनाई करण्यात आली होती.

अन्नत्याग आंदोलन

अटक झाल्यापासून पोलिस कारवाई व सरकारचा निषेध करीत रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. हेच आंदोलन कारागृहातही करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

पोलिसांनी आकस बुद्धिने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचे काम केले असून हेतुपुरस्सर अट्टल गुन्हेगारांसारखी वागणूक दिली असल्याचा आरोप तुपकरांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Quality Export Banana: धाराशिव जिल्ह्यातील केळी निर्यातीसाठी पोषक; कोपार्डेकर

Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराच्या मुलीचा मृत्यू

Karnataka Sugarcane Protest: बेळगावात ऊसदर आंदोलन पेटले, हत्तरगी टोल नाक्याजवळ दगडफेक, मंत्र्यांच्या कारवर चप्पला भिरकावल्या

Agrowon Podcast: हरभऱ्याचे भाव कमीच; मक्याचा भाव दबावातच, सोयाबीन भाव स्थिर, कापूस तसेच मिरचीचे दर टिकून

Agriculture Loan: कर्जमुक्‍त शेतकऱ्यांना तत्काळ कर्जाची उपलब्धता करा

SCROLL FOR NEXT