Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : बॅंकांना यंदा २२ हजार कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट

Agriculture Credit : बँकांनी या वर्षी गेल्या वेळेच्या तुलनेने विविध विषयाशी संबंधित ७ हजार १६७ कोटींच्या कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट वाढवून २२ हजार ४०५ कोटींचे उद्दिष्ट घेतले आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : बँकांनी या वर्षी गेल्या वेळेच्या तुलनेने विविध विषयाशी संबंधित ७ हजार १६७ कोटींच्या कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट वाढवून २२ हजार ४०५ कोटींचे उद्दिष्ट घेतले आहे. यामध्ये कृषी क्षेत्राला ४०२१ कोटी, उद्योगासाठी ५ हजार ६३५ कोटींचे व पीककर्जासाठी २ हजार २५० कोटीचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय बँकर्स समितीची वार्षिक कर्ज योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ही माहिती समोर आली.

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मीना, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय प्रबंधक महेश डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे,

सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, सर्व बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, विविध विभागांचे विभागप्रमुख यांची उपस्थिती होती. जिल्हा अग्रणी बँकेच्या वार्षिक ऋण योजना २०२३-२४ अहवालाचे प्रकाशन या वेळी जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आले.

‘अधिकचे शुल्क घेतल्यास सीएससी केंद्रावर कारवाई’

शेतकऱ्यांना पीकविमा भरताना अधिकचे शुल्क आकारल्यास सीएससी केंद्रावर कारवाई करण्यात येणार. जिल्ह्यातील पीकविमा भरताना काही अडचणी आल्यास आपले सरकार सेवा केंद्र आणि पीकविमासाठी शासनांनी नियुक्ती केलेले चोलामंडल एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा समन्वयक, ईश्‍वर भिंगारे यांच्या- ८५५१०२०३१४ या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा.

तसेच कंपनीचा कार्यालाचा पत्ता ः एन-11 सुदर्शन नगर, जळगाव रोड, मयूरी हॉटेल जवळ, औरंगाबाद या पत्त्यावर देखील संपर्क साधता येईल. याबाबत सर्व कृषी अधिकारी, तहसीलदार यांनी शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्याबाबत मार्गदर्शन व जाणीवजागृती करून एकही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी. असे पाण्डेय यांनी निर्देशित केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT