Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : बुलडाण्यातील आठ मंडलांत पावसाचा २१ दिवसांचा खंड

Drought Condition : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.

Team Agrowon

Buldana News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत या खरीप हंगामात ज्या महसूल मंडलांत कमी पावसामुळे ५० टक्के उत्पादन घटीची शक्यता निर्माण झाली आहे, अशा मंडलांतील शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील आठ महसूल मंडलांत पावसात २१ दिवसांचा खंड पडल्याने सर्व्हेक्षणाचे काम हातात घेण्यात आले आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. यामुळे जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या तीन तालुक्यातील आठ मंडले निकषात बसत आहेत.

या मंडलांत कुठे २४ जुलै ते २८ ऑगस्ट तर, कुठे २९ जुलै ते १८ ऑगस्ट या काळात पावसात खंड पडल्याची नोंद झालेली आहे. यात जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव, जामोद, आसलगाव, संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर, बावनबीर, पातुर्डा, शेगाव तालुक्यात जवळा, मनसगाव मंडलांचा समावेश आहे.

या सर्व मंडलांमध्ये पावसात खंड पडल्याने अपेक्षित उत्पादनात घट अपेक्षित गृहीत धरली जात आहे. या मंडलांतील नुकसानभरपाई निश्‍चितीसाठी सर्व्हेक्षण करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी समितीचे गठण करण्यात आले.

या समितीत तालुका कृषी अधिकारी हे अध्यक्ष असून कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, मंडल कृषी अधिकारी, पीक विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी सहायक (दोन) व संबंधित शेतकरी असे प्रतिनिधी आहेत.

समिती नेमून ज्वारी, मका, सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची अंतिम पेरणी अहवाल ग्राह्य धरून लागवडीखालील पिकाचे ५ टक्के क्षेत्रात १० वेगवेगळ्या ठिकाणी सर्व्हेक्षणाचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढतेय

Modern Farming Techniques: शेतकऱ्यांनी जाणले संत्रा-कापूस पिकाचे तंत्रज्ञान

Agriculture Department Inspection: खत-बियाणे विक्रेत्यांना दणका

Rainfall Sowing Advisory: मॉन्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये : दत्तकुमार कळसाईत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, ३४४ कोटी निधी मंजूर

SCROLL FOR NEXT