Lumpy Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy : राजापुरात २० जनावरांचा ‘लम्पी स्कीन’मुळे मृत्यू

लम्पी स्कीनचा संसर्ग रोखण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाकडून जोरदार प्रयत्न आणि उपाययोजना केल्या जात आहेत.

Team Agrowon

राजापूर, जि. रत्नागिरी ः गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यामध्ये ‘लम्पी स्कीन’ने (Lumpy Skin) पुन्हा डोके वर काढले आहे. अनेक गावांमधील जनावरांना लम्पी स्कीन (Lumpy) आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील दीडशेहून अधिक गुरांना (Animal) या आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. त्यापैकी २० गुरे मृत्युमुखी पडली तर उर्वरित जनावरे पशुविभागाने लसीकरणासह (lumpy Vaccination) अन्य तातडीने उपचार केल्यामुळे बरी झाली आहेत.

अद्यापही २३ गुरे ‘लम्पी स्कीन’ने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका पशुवैद्यकीय विभागाकडून देण्यात आली.

लम्पी स्कीनचा संसर्ग रोखण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाकडून जोरदार प्रयत्न आणि उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र तरीही शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून आजारग्रस्त जनावरे मोकाटपणे फिरत असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे अन्य जनावरांना आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संसर्ग झालेली जनावरे मोकाट सोडू नयेत, अन्यथा त्यांच्या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी, पशुपालकांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Crop Failure : पावसाअभावी मका पिकावर नांगर; कोथिंबिरीवरही रोटर फिरविला

Farmer Protest: सरकारच्या धोरणांविरोधात मूर्तिजापुरात ‘काळा पोळा’

Krishi Seva Kendra : तेरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Farmer Advisory: पावसाच्या खंडात तातडीच्या उपाययोजना करून पिके वाचवा : डॉ. आनंद गोरे

SCROLL FOR NEXT