Natural Sugar Agrowon
ताज्या बातम्या

Natural Sugar : ‘नॅचरल’कडे १५ हजार हेक्टर उसाची नोंद

Sugarcane Cultivation : या वर्षी कारखान्याकडे १५ हजार हेक्टर्सची ऊस नोंद झाली आहे. येत्या हंगामासाठी कारखान्याचे १२ लाख मे.टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.

Team Agrowon

Dharshiv News : ‘‘या वर्षी कारखान्याकडे १५ हजार हेक्टर्सची ऊस नोंद झाली आहे. येत्या हंगामासाठी कारखान्याचे १२ लाख मे.टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. उद्दिष्ट पूर्तीसाठी कारखान्याची मशिनरी सज्ज करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे,’’ अशी माहिती नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी दिली.

नॅचरल शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज लि. युनिट नं. एक साईनगर रांजणी या कारखान्याचे यंदाच्या गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन ठोंबरे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ११) करण्यात आले.

या वेळी सहकार्यकारी संचालक हर्षल ठोंबरे, तांत्रिक संचालक अनिल ठोंबरे, संचालक पांडुरंग आवाड, बालाजी तट, प्रभावती गोरे, प्रवर्तक संभाजी रेड्डी, किशोर डाळे, डॉ. सर्जेराव साळुंके, माणिकराव मोरे,

भालचंद्र गुजर, दिलीप भिसे, नाथ रेड्डी, भागवतराव शिंदे, ज्ञानोबा कदम, विष्णू मोहिते, तसेच श्री साई पतसंस्था व एनसाई मल्टिस्टेटचे संचालक आणि कारखान्याचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठोंबरे म्हणाले, ‘‘कारखाना कार्यक्षेत्रामध्ये उन्हाळ्यात झालेला पाऊस व मांजरा धरणातील पाण्याची झालेली उपलब्धता, यामुळे ऊस पिकाची परिस्थिती अत्यंत चांगली होती. मात्र जून व जुलैचा अर्धा महिना गेला, तरी समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे ऊस पिकाची वाढ खुंटलेली आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT