Agriculture Department
Agriculture Department Agrowon
ताज्या बातम्या

कृषी सहायक, सेवक संवर्गाची राज्यात १४०० पदे रिक्त

टीम ॲग्रोवन

अकोला ः राज्यात गेल्या काही वर्षात कृषी खात्यात नोकरभरती (Recruitment In Agriculture Department) न केल्याने कृषी सेवक (Krushi Sevak), कृषी सहायक संवर्गाची सुमारे १४०० पेक्षा अधिक पदे रिक्त असून, या पदांच्या भरतीकडे कृषी पदवीधर (Agriculture Graduate) आस लावून बसले आहेत. या पदांची नोकरभरती व्हावी यासाठी गेल्या सरकारच्या काळात विद्यार्थ्यांच्या संघटनांनी (Student Organization) सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, काहीही प्रगती झाली नाही. आता नवीन सरकार राज्यात आल्याने या सरकारकडून नोकरभरतीबाबत ठोस काही पावले उचलले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केल्या जाऊ लागली आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एकीकडे घोषणा केल्या जातात. दुसरीकडे आजही ग्रामीण भागात थेट शेतकऱ्यांशी संपर्क असलेल्या कृषी विभागामधील वर्ग ३ पदावरील कृषी सहायकाची सुमारे १४२६ पदे रिक्त असल्याची आकडेवारी माहिती अधिकारातून समोर आली आहे. यात सर्वाधिक अनुशेष विदर्भात असल्याचे दिसून येते. सर्वाधिक २९२ पदे नागपूर विभागात रिक्त आहेत. तर अमरावतीमध्ये ११५ पदे भरलेली नाहीत. याशिवाय नाशिक विभागात २९०, पुणे १५५, ठाणे २६५, कोल्हापूर १८५, औरंगाबाद १०७, लातूर ५५ अशी मिळून १४६४ पदे रिक्त आहेत.

डिसेंबर २०२२ अखेर ही रिक्त पदे १७०० वर पोचू शकतात. राज्यात कृषी विभागाच्या आठ विभागात मिळून १०४३९ पदे मंजूर असून ८९०९ पदे भरलेली आहेत. पदे रिक्त असल्याने अनेक ठिकाणी एकच कृषी सहायक अनेक गावांचा कारभार सांभाळत आहेत. योजनांची अंमलबजावणी करताना त्यांची ओढाताण सातत्याने होत आहे. तर दुसरीकडे कृषी पदवीधारक हे नोकरी नसल्याने बेरोजगार बनलेले आहेत.

कोरोनाने आणली नोकरीवर टाच

कृषी सेवक, कृषी सहायक ही पदे भरण्याबाबत विद्यार्थी संघटना सातत्याने लोकप्रतिनिधींमार्फत शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. याबाबत एकाने माहिती अधिकार माहितीसुद्धा घेतली. त्यानुसार राज्यात उपरोक्त रिक्त पदांची संख्या अधिकृत समोर आली. कोरोनामुळे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये विभाग वगळता कोणत्याही विभागाने नवीन पदभरती करू नये, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. याचा परिणाम कृषी खात्याच्या भरतीवर झालेला आहे. आता परिस्थिती सुधारत असल्याने नवीन सरकारने तरी या पदांच्या भरतीबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी राज्यातील हजारो पात्र उमेदवार करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

Flower Disease : फ्लॉवर पिकातील ‘गड्डा सड रोग’

Panchayat Development : पंचायत विकासाची नोंदणी

SCROLL FOR NEXT