Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा योजने अंतर्गत १३ लाखांवर अर्जाद्वारे नुकसानीची पूर्वसूचना

टीम ॲग्रोवन

लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा (PM Crop Vima Yojna) योजने अंतर्गत खरीप हंगामातील (Kharip Season) पीक नुकसानीची (Crop Damage) पूर्वसूचना दिली आहे. त्यामध्ये १३ लाख ३४ हजार ३३१ अर्जदारांचा समावेश आहे.

त्यापैकी ४ लाख २४ हजारावर सर्वेक्षण प्रलंबित असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. अतिवृष्टीसह नैसर्गिक आपत्तीने शेती पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत शेतकऱ्यांनी निर्धारित पर्यायाद्वारे विमा कंपनीला कळविणे आवश्यक आहे.

९ लाख ९ हजार ८४५ अर्जांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दुसरीकडे ४ लाख २४ हजार ४८६ अर्जांची सर्वेक्षण प्रलंबित असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. प्रलंबित सर्वेक्षण पूर्ण होऊन प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील पीक नुकसानीची निश्‍चित भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कधी मिळणार हा प्रश्‍न आहे.

पाच जिल्ह्यांत ३६ लाख शेतकरी सहभागी लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांतील ३६ लाख २९ हजार ७०४ शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत. त्यापैकी ५० हजार ६८१ कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज असून ३५ लाख ७९ हजार २३ बिगर कर्जदार शेतकऱ्यांची अर्ज आहेत.

विमा योजनेअंतर्गत २३ लाख ४४ हजार ३०५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हानिहाय अर्ज व प्रलंबित सर्वेक्षण जिल्हा अर्ज प्रलंबित सर्वेक्षण लातूर ३२९९८९ ८२२२४ उस्मानाबाद ४१८०४९ १३०८२६ नांदेड ३०२६५८ १२५९११ परभणी १०२५१४ २४१७४ हिंगोली १८१८२१ ६१३५१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

Education Fund : रानमसलेच्या प्राथमिक शाळेसाठी ‘लक्ष्मी’कडून सव्वा कोटींचा निधी

Lake Conservation : जैवविविधतेच्या बळावर ‘त्या’ करतात तलावाचे संवर्धन

SCROLL FOR NEXT