Shree Vighnar sugar mill Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Mill : ‘विघ्नहर’चे यंदा ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

३७ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन

टीम ॲग्रोवन

जुन्नर : येथील श्री विघ्नहर सहकारी साखर (Shri Vighnahar Sugar Mill) कारखान्याच्या ३७ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नी प्रदीपन बल्लाळवाडी (ता.जुन्नर) येथील प्रगतिशील सभासद शेतकरी पंकज शिवाजी वामन (Pankaj Shivaji Vaman) व त्यांच्या पत्नी दीपाली यांच्या हस्ते बुधवारी (ता. २१ सप्टेंबर) रोजी पार पडले. या वेळी उपाध्यक्ष अशोक घोलप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या वेळी सुमित्रा शेरकर, अध्यक्ष सत्यशील शेरकर, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी प्रास्ताविक केले.

घुले म्हणाले, ‘‘यंदा विघ्नहर कारखान्याने ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी ऊसतोडणी व गाळपाचे नियोजन केले आहे. मंत्री समितीच्या बैठकीत १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून कारखाना गाळपासाठी सज्ज आहे. नोंद झालेल्या संपूर्ण उसाचे गाळप करण्यात येणार आहे.’’

अध्यक्षीय भाषणात उपाध्यक्ष अशोक घोलप म्हणाले, ‘‘आगामी गाळपाच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी सर्व घटक जबाबदारीने कामकाज करतील. एकनिष्ठता व जिद्दीने कामकाज करण्याच्या पद्धतीमुळे विघ्नहर परिवाराने सर्वांचा विश्वास संपादन केला आहे. स्व. शेठबाबा आणि स्व. अण्णांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचे काम सुरू आहे. प्रगतिशील सभासद शेतकरी पंकज वामन यांच्या ऊस शेतीचा आदर्श सभासदांनी घ्यावा,’’ असे आवाहनही त्यांनी केले.

अध्यक्ष सत्यशील शेरकर व संचालकांच्या हस्ते पंकज वामन यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संचालक संतोषनाना खैरे, धनंजय डुंबरे, देवेंद्र खिलारी यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन सुहास शेटे यांनी केले.

कारखान्याला पुरस्कार

विघ्नहर कारखान्याला अनेक पुरस्कार मिळाले असून नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी, नवी दिल्ली यांचा गळीत हंगाम २०२१-२०२२ साठीचा उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Haryana agriculture loans : कृषी कर्ज वाटपासाठी हरियाणा सरकार वापरणार तंत्रज्ञान; बँकाचे खेटे मारण्याची गरज नाही

Akola Mayor Election: अकोल्यात भाजपच्या खेडकर महापौर, तर गोगे उपमहापौर

Rubber MSP: नैसर्गिक रबर दरात घसरण, हमीभाव देण्याची कर्नाटकची केंद्राकडे मागणी

Wheat Crop Management: ढगाळ वातावरणात गहू पिकासाठी उपाययोजना

Sugar Production: ‘नॅचरल शुगर’मध्ये नऊ लाख १११ व्या साखर पोत्याचे पूजन

SCROLL FOR NEXT