आज आपण सोयाबीन, कापूस, जिरा, मोहरी आणि कारले बाजाराची माहिती घेणार आहोत.सोयाबीनच्या भावात सुधारणादेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात आज काहीशी सुधारणा दिसून आली. मागील आठवडाभर भावपातळी स्थिरावली होती. सोयापेंड आणि सोयातेलाला उठाव असल्याने सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदी भाव ५ हजार ९०० ते ६ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. सोयाबीनच्या भावाला चांगला आधार आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावातील सुधारणा टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस स्थिरवलाकापसाच्या बाजारातील चढ उतार काहीसे स्थिरावले आहेत. त्यामुळे सरासरी दरपातळी स्थिर दिसत आहे. कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सीसीआयची कापूस खरेदीही सुरु आहे. खुल्या बाजारात अनेक भागात भावपातळी हमीभावाच्या खाली गेल्याने सीसीआयकडे आवक सुधारत असल्याचे दिसते. सध्या कापूस बाजारावर सीसीआयची कापूस विक्री, अतिरिक्त लांब धाग्याची मुक्त आयात याचा दबाव आहे. तर अमेरिकेने कापड आयातीवरील शुल्क कमी केल्याचा आधार आहे. कापूस भाव आता सीसीआयच्या विक्रीनुसार बदलेल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: हळदीच्या भावात चढ उतार; सोयाबीन भाव टिकून, कापूस भावात नरमाई, तूर तेजीतच तर पपईला उठाव.जिऱ्याला चांगला उठावदेशातील बाजारात सध्या जिऱ्याला चांगला उठाव आहे. तर बाजारातील आवक मर्यादीत आहे. त्यामुळे जिऱ्याचे भाव टिकून आहेत. सध्या जिरा बाजारात सरासरी प्रतिक्विंटल २१ हजार ते २५ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. जिऱ्याची उपलब्धता सध्या देशात मर्यादीत असल्याचे जाणकारांनी सांगितले. तर दुसरीकडे जिऱ्याला लग्नसराई आणि समारंभांमुळे चांगली मागणी आहे. याचा आधार जिऱ्याच्या भावाला आहे. त्यामुळे जिऱ्याचे भाव पुढील काही आठवडे टिकून राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: तुरीचा भाव टिकून; सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिरावला, डाळिंबाचे भाव टिकून तर आल्याला उठाव.मोहरी आवक मर्यादीतदेशातील बाजारात मोहरीला चांगली मागणी आहे. मात्र दुसरीकडे मोहरीची आवक मर्यादीत आहे. मोहरी तेल आणि पेंडेला उठाव मिळत आहे. सोयातेल, पामतेल आणि सूर्यफुल तेलाच्या भावाचा मोहरी तेलालाही आधार मिळत आहे. सध्या मोहरी हमीभावापेक्षा अधिक दरात विकली जात आहे. मोहरीचा हमीभाव ६ हजार २०० रुपये आहे. तर बाजारात मोहरी प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ३०० ते ६ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. मोहरीचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज मोहरी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कारले टिकूनराज्यातील बाजारात कारल्याची मागणी टिकून आहे. तर दुसरीकडे कारल्याची आवकही स्थिर दिसत आहे. त्यामुळे भावपातळीही बहुतांशी बाजारात स्थिरावली आहे. सध्या कारली बाजारात ४ हजार ५ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकली जात आहे. बाजारातील कारल्याची आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर दुसरीकडे कारल्याला उठावही कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कारल्यचे भाव या भावपातळीच्या दरम्यान आणखी काही दिवस दिसू शकतात, असा अंदाज कारली बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.