आज आपण कापूस, सोयाबीन, हळद, कलिंगड आणि मका बाजाराची माहिती घेणार आहोत.सोयाबीनमध्ये सुधारणादेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. प्रक्रिया प्लांट्सने खरेदीच्या भावात आजही वाढ दिसून आली. प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीच्या भावात आज १०० ते १५० रुपयांची वाढ केली होती. बाजार समित्यांमध्येही सोयाबीनच्या भावात वाढ दिसून आली. सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील सोयाबीनची आवकही कमीच आहे. यामुळे सोयाबीनचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस टिकून देशातील बाजारात कापसाचे भावही टिकून होते. बाजारातील कापसाची आवक सध्या कमी झालेली आहे. सीसीआयच्या कापूस विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीसीआयने कापूस विक्रीचा भाव वाढवलेला आहे. निर्यातीसाठीही सध्या विचारणा वाढल्याचे निर्यातदार सांगत आहेत. सध्या बाजारात कापूस ७ हजार ४०० ते ८ हजारांच्या दरम्यान विकला जात आहे. युध्दामुळे जागतिक कापूस बाजारातील समिकरण बदलत आहे. यामुळे कापूस भावाला आधार आहे, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले आहे. .Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा, शेवगा नरमला, कापूस स्थिर, बेदाणा तेजीत, स्ट्राॅबेरीला मागणी .हळद स्थिरदेशातील बाजारात नव्या हळदीची आवक काहिशी सुधारत आहे. हळदीची काढणी काही भागात वेग घेत असल्याने उपलब्धता सुधारत आहे. दुसरीकडे हळदीची उत्पादकता कमी आल्याचे शेतकरी सांगत आहेत. हळदीला सण आणि समारंभांमुळे मागणी चांगली आहे. तरीही नव्या मालाच्या आवकेचा दबाव आहे. सध्या हळदीला बाजारात १० हजार ते १४ हजारांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर काहिसा दबाव वाढू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा, कापसाला आधार, आल्याचे भाव टिकून, मक्याची आवक स्थिर, भेंडीची आवक स्थिर.कलिंगड आवकेत वाढ राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कलिंगडाची आवक वाढत आहे. कलिंगडाला उठावही चांगला असला तरी आवकेचा दबाव आहे. कलिंगडाचे भावही मागील काही दिवसांमध्ये नरमले आहेत. मागील आठवड्यात सरासरी १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान असलेला भाव सध्या १००० ते १२०० रुपयांच्या दरम्यान आला आहे. वाढत्या उन्हामुळे कलिंगडाला मागणी वाढत आहे. कलिंगडाची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर आणखी काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. .मका दबावातचदेशातील बाजारात मक्याचा भाव दबावातच आहे. यंदा देशात मक्याचे उत्पादन वाढले आहे. तर मक्याला असलेली मागणी यंदा कमी आहे. खरिपातील उत्पादनानंतर रब्बीतही चांगल्या उत्पादनाचा अंदाज आहे. सध्या बाजारातील मक्याची आवक चांगली सुरु आहे. यामुळे भावही दबावाताच आहे. मक्याला प्रतिक्विंटल २४०० रुपये हमीभाव असताना बाजारात केवळ १५०० ते १७०० रुपयांचा भाव मिळत आहे. मक्याचा भाव पुढील काही काळ हमीभावापेक्षा कमीच राहील, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.