कोणते सेंद्रिय खत पिकासाठी चांगले?

पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये सूक्ष्मजिवाणू अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता टिकवून ठेवायची असेल, तर सेंद्रिय खतांचा वापर वाढवला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय खते शेतकरी वापरतात.
different types of organic manure like vermicompost, compost and farm yard manure
different types of organic manure like vermicompost, compost and farm yard manure
Published on
Updated on

शेणखत- चांगल्या कुजलेल्या एक टन शेणखतातून जवळपास १०० किलो सेंद्रिय कर्ब जमिनीत मिसळला जातो. शेणखतामुळे जमिनीची सच्छिद्रता वाढून सेंद्रिय कर्बाचे योग्य व्यवस्थापन होते. शेणखतातून नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यासोबतच गंधक, मंगल, जास्त, तांबे, लोह आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. सर्वसाधारणपणे शेणखतामध्ये नत्राचे प्रमाण ०.५ ते ०.८%, स्फुरद ०.२ ते ०.४% आणि पालाश ०.५ ते १.२% असते.

कंपोस्टखत- कंपोस्ट खत निर्मितीमध्ये शेतातील उरलेल्या पिकांच्या अवशेषांचा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त वापर केला जातो. कंपोस्ट खत निर्मितीच्या नाडेप कंपोस्ट, इंदोर कंपोस्ट, बेंगलोर कंपोस्ट, पीडीकेव्ही कंपोस्ट अशा विविध पद्धती आहेत. या सर्व कंपोस्ट पद्धतींमध्ये पिकांचे अवशेष, शेण, पाणी, माती आणि कचरा कुजवणाऱ्या विविध बुरशींचा नियंत्रित वापर केला जातो. शेतातील पीक अवशेषांचा म्हणजेच जमिनीतून शोषून घेतलेल्या अन्नद्रव्यांचा पुनर्वापर यात केला जातो. कंपोस्ट खते शेणखतापेक्षा अधिक प्रभावी असतात. कंपोस्ट खतामध्ये नत्राचे प्रमाण ०.८ ते २.० %, स्फुरद ०.५ ते १.५% आणि पालाश ०.७ ते १.५% असते.


गांडूळ खत- गांडुळ त्यांच्या आवडीचे खाद्य अधिक प्रमाणात खात असतात. त्यांची वाढ व प्रजोत्पादन झपाट्याने होते. झाडांची पाने, कापलेले गवत, तण, काडीकचरा, पालापाचोळा, भाज्यांचे टाकावू भाग, कंपोस्टखत, शेणखत, लेंडीखत यांसारखे पदार्थ गांडुळाच्या आवडीचे आहेत. सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान विघटनासाठी गांडुळे अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळ खत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखतापासून सुद्धा खत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीत कमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत व सेंद्रिय खत यांचे मिश्रण अर्धे अर्धे वापरून गांडूळ खत तयार करता येते. बायोगॅस प्लॅन्टमधून निघालेली स्लरीसुद्धा गांडूळ खाद्य म्हणून उपयोगात आणता येते.

गांडूळखत लवकर तयार होते याउलट कंपोस्ट किंवा शेणखत मंदगतीने तयार होते. गांडूळखताला घाण वास, माश्‍या, डास यांचा उपद्रव होत नाही. ते आरोग्याला अपायकारक नाही. गांडूळ खत तयार करण्यासाठी जागा कमी लागते. ४ x १ x ७५ फूट आकाराच्या गादीवाफ्यापासून दर पंधरा दिवसाला ३ टन गांडूळखत मिळते. तर ३ x १० x १० फूट आकाराच्या खड्ड्यापासून दर महिन्याला १० टन खत मिळते. गांडूळ खता व्यतिरिक्त गांडूळ अर्कही मिळत असतो. पिकाच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात उपलब्ध होतात. गांडुळांच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com