Soil Health : शेतात गाळमाती टाकताना कोणती काळजी घ्यावी?

उन्हाळ्यामध्ये धरणाचं पाणी किंवा एखाद्या तलावातील पाणी कमी झालं तर अशा ठिकाणचा गाळ मोठ्या प्रमाणात शेतात टाकला जातो.
Soil Health
Soil Health Agrowon

उन्हाळ्यात बरेच शेतकरी शेतात गाळ माती (soil) टाकतात. त्यामुळे शेतात गाळमाती टाकणं हे काही नविन नाही.

उन्हाळ्यामध्ये धरणाचं पाणी किंवा एखाद्या तलावातील पाणी कमी झालं तर अशा ठिकाणचा गाळ मोठ्या प्रमाणात शेतात टाकला जातो.

गाळ टाकणं हे मातीच्या सुपीकतेसाठी (Soil Fertility) खूप महत्त्वपूर्ण असून गाळ भरघोस उत्पादनासाठी सुद्धा फायदेशीर आहे. मात्र गाळमाती कोणत्या जमिनीत मिसळावी?, किती प्रमाणात मिसळावी? याशिवाय माती मिसळताना काय काळजी घ्यावी? याविषयी माहिती नसल्यामुळे गाळमातीचा अपेक्षित परिणाम मिळत नाही.

त्यामुळे गाळमाती मिसळताना नेमकी काय काळजी घ्यावी? याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. 

गाळमाती वापरताना घ्यायची काळजी

शेतात मिसळण्याच्या गाळमातीचे आणि ज्या शेतात गाळमाती वापरावयाची आहे, त्या ठिकाणच्या मातीचं भौतिक व रासायनिक पृथःकरण करण्यासाठी माती परिक्षण करावं. 

सर्वसाधारणपणे एप्रिल, मे महिन्यात शेतात गाळमाती मिसळावी.

गाळमाती वापराचा चांगला परिणाम साध्य करण्यासाठी फक्त गाळमाती जमा करून शेतातील मातीत चांगली मिसळावी.

Soil Health
Soil Health : जमिन क्षारपड का होते?

हलक्या आणि कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेल्या जमिनीमध्ये गाळमाती वापरण्याला प्राधान्य द्यावं.

गाळमाती व शेतजमिनीतील चिकणमातीच्या प्रकारानुसार गाळ वापर मात्रा निश्चित करावी, त्यामुळे गाळमातीचा कार्यक्षम वापर करता येईल.

सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात साठवण तलाव किंवा धरणातील पाणी आटतं. त्याचवेळी गाळमाती बाहेर काढून गाळमाती शेतात पसरावी.

पाच वर्षातून एकदा साठवण पद्धतीतील गाळमाती बाहेर काढून शेतात पसरावी. 

हलक्या व मध्यम जमिनीत फळबाग लागवड करायची असेल तर खोदलेल्या खड्ड्यात किंवा शेताच्या उतारास आडवे चर खोदून त्यामध्ये गाळमाती भरावी.

गाळमातीचा सामू ८.५ पेक्षा जास्त आणि २.५ डेसिसायमन प्रतिमीटर जास्त असल्यास अशी माती शेतात पसरू नये.

पाणी साठवण पद्धतीतील काठावरील माती खोदून शेतात पसरू नये.

चुनखडीयुक्त गाळमाती शेतात पसरण्यासाठी वापरू नये, अशा गाळमातीचा वापर केल्यास जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांवर विपरीत परिणाम होतो आणि पिकाची उत्पादकता घटते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com