
Crop Management : पीक नियोजनामध्ये बीजप्रक्रियेपासून पीक संरक्षणापर्यंतच्या बाबी सेंद्रिय किंवा जैविक पद्धतीने हाताळता येतात. यामध्ये पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहचवता कीड आणि रोगाच नियंत्रण होत. हे सेंद्रिय घटक कोणते आहेत याविषयीची माहिती घेऊ.
१) जिवामृत व बीजामृत - बियाणे प्रक्रियेसाठी जिवामृत किंवा बीजामृताचा उपयोग होतो. याचा उपयोग पिकाचे किडी व रोगांपासून प्राथमिक अवस्थेत रक्षण करण्यासाठी होतो.
४) व्हर्मिवॉश - हे सर्व प्रकारच्या पिकांसाठी महत्त्वपूर्ण अन्नद्रव्ये,अमिनो ॲसिड, ऑक्झिन्स, जिबरेलिन्स, एन्झाइम्सची पूर्तता करण्यासाठी उपयुक्त आहे. व्हर्मिवॉश बीजप्रक्रियेसाठी वापरतात.
५) व्हर्मिबेड वॉश - सर्व प्रकारच्या पिकांसाठी महत्त्वपूर्ण अन्नद्रव्ये, अमिनो ॲसिड, ऑक्झिन्स, जिबरेलिन्स, एन्झाइम्सची पूर्तता करण्यासाठी. २०-३० लिटर व्हर्मिबेड वॉश प्रति १७० ते १८० लिटर पाण्यात प्रति एकर पिकावर अथवा जमिनीवर फवारणीसाठी वापरावे.
६) निंबोळी अर्क - सर्व प्रकारच्या लहान अळ्या, खोड पोखरणाऱ्या अळ्या, भुंगेरे, ढेकूण, मावा इत्यादींच्या व्यवस्थापनासाठी. ५० मिलि प्रति १० लिटर पाण्यात पिकावर फवारणीसाठी वापरावे.
७) निळे चिकट सापळे - पंखवर्गीय रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी. ४-६ निळे चिकट सापळे प्रति एकर या प्रमाणात वापरावेत.
८) पिवळे चिकट सापळे - पांढऱ्या माशीच्या व इतर पंखवर्गीय किडी च्या व्यवस्थापनासाठी. ४-६ पिवळे चिकट सापळे प्रति एकर या प्रमाणात वापरावेत.
९) जमिनीची सुक्ष्म अन्नद्रव्याची गरज पूर्ण करण्यासाठी वेस्ट डिकंपोझर मिश्रणाचा उपयोग होतो. यामध्ये ४० ग्रॅम वेस्ट डिकंपोझर कल्चर + १० किलो गूळ + १००० लिटर पाणी. सदर वेस्ट डीकंपोझर मिश्रण खालील प्रमाणे वेगवेगळ्या माध्यमातून पिकाची सूक्ष्म अन्नघटकांची गरज पूर्ण करण्याकरिता वापरता येईल. वेस्ट डिकंपोझर मिश्रणामध्ये तीन प्रकारच्या मिश्रणाचा समावेश होतो.
१) जैविक सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण - ५० लिटर जैविक सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाचे द्रावण + १५० लिटर वेस्ट डीकंपोझर मिश्रण याप्रमाणे २०० लिटर द्रावण प्रति एकर जमिनीत ओल असताना, जमिनीवर फवारणी अथवा ठिबकद्वारे देण्यासाठी.
२) लेंडी खत मिश्रण - २० लिटर बकरी लेंडीखत मिश्रणाचे द्रावण + १८० लिटर वेस्ट डीकंपोझर याप्रमाणे २०० लिटर द्रावण प्रति एकर जमिनीत ओल असताना जमिनीवर फवारणी अथवा ठिबकद्वारे देण्यासाठी करतात.
३) दगडांचे मिश्रण - वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या रंगाचे, दगड पाण्यात अथवा वेस्ट डीकंपोझर मिश्रणामध्ये भिजवून, भिजवलेल्या दगडाचे ५० लिटर मिश्र द्रावण + १५० लिटर वेस्ट डीकंपोझर याप्रमाणे जमिनीतील ओल असताना २०० लिटर द्रावण प्रति एकर जमिनीत ओल असताना, जमिनीवर फवारणीसाठी अथवा ठिबकद्वारे देण्यासाठी.
१०) जैविक आच्छादन - निंदण करताना संपूर्ण तणांचे अवशेष दोन ओळींमधील जागेत पातळ थरात पसरवून जैविक आच्छादन करावे. जैविक आच्छादनामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. हे अवशेष कुजल्यानंतर त्यापासून चांगले जैविक खत तयार होते.
----------
माहिती आणि संशोधन - जितेंद्र दुर्गे, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.
(An initiative by Salam Kisan.)
(सलाम किसान हे सुपर अॅप असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा व उत्पादने उपलब्ध करून दिली जातात.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.