हरितगृहामध्ये (Ployhouse) प्रामुख्याने स्टीलचा सांगाडा, आच्छादन साहित्य, पाणी जाण्यासाठी गटर व वायुविजन यंत्रणा; तसेच हवामान नियंत्रण यंत्रणा बसविलेल्या असतात. हरितगृहाची निर्मिती करण्यासाठी पुढील आवश्यक तांत्रिक बाबींचा अवलंब करावा.
- खांबासाठी पक्का पाया घेतलेला असावा. खड्ड्याचा आकार १.५ बाय १.५ बाय २ फूट असावा. त्यात मधोमध फाउंडेशन पाईप पासून त्यात होल्ड फास्ट बार टाकून काँक्रीट भरावे. काँक्रीट भरताना सिमेंट, वाळू व खडीचे प्रमाण १:४:८ याप्रमाणे घ्यावे.
- छताला ठेवण्यात येणारे व्हेट ०.८ ते १ मीटर उंचीचे असावे. व्हेंन्ट ची दिशा पूर्व किंवा उत्तर असावी. हरितगृहाच्या एका कंपार्टमेंटची रुंदी ८ मीटर पेक्षा जास्त नसावी. दोन कंपार्टमेंट मध्ये छताच्या पॉलिथिन फिल्म वरील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी जीआय पत्र्याचेच गटर असावे, छतासाठी लागणारी फिल्म अल्ट्राव्हायोलेट प्लास्टिकची असावी व त्याची जाडी 200 मायक्रॉन असावी.
- फिल्म वापरताना इतर निकष मानांकन प्रमाणे असावेत. साधारणपणे एक किलो फिल्ममध्ये ५.३ चौरस मीटर क्षेत्र अच्छादता येते.
- फिल्मची पारदर्शकता उच्च दर्जाची ८० ते ८५ टक्के असावी. पॉलिथिन फिल्मची फिटिंग अल्युमिनियम चैनल पट्टीमध्ये जीआय स्प्रिंग च्या साह्याने करावी.
- चारही बाजूने वायुविजन साठी ३ मीटर उंचीची जागा ठेवावी. ती रात्रीच्या वेळी कर्टनच्या साहाय्याने बंद करण्याची सोय ठेवावी.
- हरितगृह उभारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यापैकी ज्या साहित्याचे आय एस आय किंवा बी आय एस मानके निश्चित करण्यात आलेली आहेत. ते साहित्य मानकाप्रमाणे असणे आवश्यक आहे.
- हरितगृहाची उंची कोकण, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र करिता सहा मीटर आणि खानदेश व विदर्भाकरिता ६.५० मीटर आहे.
- हरितगृहाच्या फाउंडेशन पाईपचा आकार ७ एम एम व कॉलमचा आकार ७६ एम एम ठेवावा.
हरितगृह उभारणीसाठी निश्चित केलेले खर्चाचे मापदंड
- हरितगृहाच्य नैसर्गिक वायूविजन व वातावरण नियंत्रित प्रकारच्या हरितगृहाच्या उभारणीसाठी आकारमानानुसार व विविध मॉडेल नुसार अनुदान देय आहे.
- प्रति चौरस मीटर क्षेत्रासाठी येणाऱ्या खर्चाचे महत्तम दंडाप्रमाणे आलेला खर्च किंवा प्रत्यक्ष लाभार्थीने केलेला खर्च यापैकी जो कमी असेल त्या खर्चाच्या ५० टक्के अनुदान देय आहे.
स्त्रोत ः कृषिदर्शनी ः महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.