Jowar Crop : ज्वारीचे आरोग्यदायी गुणधर्म काय आहेत?

ज्वारीमध्ये तंतूमय घटकांचे प्रमाण चांगले असते, जे आपल्या शरीराला दररोज आवश्यक असलेल्या ४८ टक्के असते. ज्वारी पचनास मदत करते म्हणून ते गॅस, गोळा येणे, बद्धकोष्ठता आणि अतिसार यांसारख्या समस्या टाळते.
Jowar Crop
Jowar CropAgrowon

सुहेल भेंडवडे

Jowar Rate : प्रामुख्याने पीठ स्वरूपात ज्वारीचा वापर होतो. ज्वारीची भाकरी अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी असते. ज्वारीच्या लाह्या बनविल्या जातात. त्या पचनास सुलभ असतात. ज्वारीच्या पिठापासून पाटवड्या, ताजी उकड बनविता येते.

भरपूर कष्ट करणाऱ्या व्यक्तीपासून ते अगदी लहान वयाच्या बाळाच्या आहारापर्यंत ज्वारीचा वापर करता येतो. तसेच उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूत ज्वारी आहारात उपयुक्त ठरते.

आरोग्यदायी गुणधर्म:

१) ज्वारीमध्ये तंतूमय घटकांचे प्रमाण चांगले असते, जे आपल्या शरीराला दररोज आवश्यक असलेल्या ४८ टक्के असते. ज्वारी पचनास मदत करते म्हणून ते गॅस, गोळा येणे, बद्धकोष्ठता आणि अतिसार यांसारख्या समस्या टाळते.

२)ज्वारीमध्ये मॅग्नेशिअम, तांबे आणि कॅल्शिअम असते. हे हाडे आणि उती मजबूत करण्यास मदत करते. ज्वारीमध्ये लोह देखील असते जे लाल रक्त पेशी वाढवण्यास मदत करते. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते.

३)ज्वारीमधील तंतूमय घटक खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. परिणामी स्ट्रोकसह हृदयविकाराची शक्यता कमी करते.

Jowar Crop
Jowar Processing : पौष्टिक ज्वारी पासून बनतात विविध पदार्थ

४) गहू आणि बार्ली आधारित पदार्थांमध्ये ग्लूटेन आढळते. ग्लूटेन असहिष्णुता असलेल्या लोकांमध्ये ग्लूटेनमुळे पचन समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ज्वारी हे ग्लूटेनमुक्त अन्न असल्याने ग्लूटेन असहिष्णुतेचा त्रास असलेल्यांसाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. ग्लूटेन असहिष्णुतेमुळे फुगणे, वेदना, पेटके इत्यादी पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

५)एक कप ज्वारीमध्ये २२ ग्रॅम प्रोटीन असते. प्रथिने केवळ तुमच्या शरीराला ऊर्जा देत नाहीत तर पेशींच्या पुनरुत्पादनातही मदत करतात.

६) ज्वारी हळूहळू पचते आणि त्यामुळे रक्तातील साखरेमध्ये हळूहळू वाढ होते. म्हणूनच ज्यांना मधुमेह आहे आणि ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

चौकट : ज्वारीमधील पौष्टिक घटक (प्रति १०० ग्रॅम)

प्रथिने : ९.४ ते १०.४ टक्के

तंतुमय घटक : १.२ ते १.६ टक्के

खनिजद्रव्ये : १.० ते १.६ टक्के

उष्मांक : ३४९ किलो कॅलरीज

कॅल्शिअम : २९ मिलिग्रॅम

किरोटीन : ४७ मिलिग्रॅम

थायमिन : ३७ मिलिग्रॅम

प्रक्रियायुक्त पदार्थ :

१. ज्वारीच्या लाह्यांचे लाडू

घटक पदार्थ --- प्रमाण

ज्वारीच्या लाह्या--- १/२ किलो

गूळ ---१/४ किलो

तूप ----थोडेसे

कृती : एका जाड बुडाच्या पातेल्यात बारीक चिरलेला गूळ घालून ढवळत राहावे. पाणी घालू नये. गूळ पातळ झाला की त्यामध्ये लाह्या घालाव्यात, ढवळावे आणि उतरवावे. तूप लावलेल्या ताटात मिश्रण काढावे. हाताला तूप लावून भराभरा लाडू वळावेत. वळून झाल्यावर लाडू हे तयार होतील.

आरोग्यदायी पेय

घटक पदार्थ--- प्रमाण

ज्वारी--- १ किलो

नाचणी --- १ किलो

सोयाबीन--- १ किलो

मूग --- १ किलो

बाजरी --- २ किलो

बदाम --- ३०० ग्रॅम

साखर --- १५० ग्रॅम

कोको पावडर --- आवश्यकतेनुसार

पाणी --- आवश्यकतेनुसार

Jowar Crop
Jowar Fodder : जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांना कडब्याची चिंता

कृती : सर्व प्रकारची धान्ये वेगवेगळ्या भांड्यात रात्रभर (१२ तास) भिजत ठेवावीत. नंतर स्वच्छ धुवून ओल्या कापडी पिशवीमध्ये सैल बांधून उबदार वातावरणात २ ते ३ दिवस मोड आणण्यासाठी ठेवावे.

या धान्यास चांगले अंकुर फुटल्यावर ते सूर्यप्रकाशात चांगले वाळवून त्यांचे अंकुर काढून टाकावेत. या धान्याचे दळून बारीक पीठ तयार करावे. साखर आणि बदाम दळून घ्यावेत. नंतर सर्व धान्यांचे पीठ, साखर, आणि बदामाची पावडर एकत्रित करावी.

या मिश्रणात कोको पावडर आणि संरक्षण मिसळावे. अशाप्रकारे तयार झालेली पावडर (१ ते २ चमचे) गरम पाण्यात किंवा दुधात मिसळून आरोग्यदायी पेय म्हणून वापरावे. मुलांसाठी आणि वयस्कर माणसासाठी अशा प्रकारचे आरोग्यदायी पेय अतिशय पौष्टिक आणि शक्तिवर्धक मानले जाते.

मधुमेहींसाठी कुकीज

घटक पदार्थ --- प्रमाण

ज्वारीचे पीठ--- ४०० ग्रॅम

माल्टेड ज्वारीचे पीठ ---२०० ग्रॅम

मैदा --- १५० ग्रॅम

माल्टेड नाचणीचा कोंडा--- ५० ग्रॅम

माल्टेड सोयाबिनचे पीठ--- १०० ग्रॅम

मेथीची पाने --- १५० ग्रॅम

जिरे पावडर --- ६ ग्रॅम

ॲसपरॅटमिन सॅकरिन--- २० ग्रॅम

वनस्पती तूप--- २५० ग्रॅम

मीठ--- ८ ग्रॅम

दही --- २५० ग्रॅम

कारल्याची पेस्ट--- ५० ग्रॅम

अमोनिअम बायकार्बोनेट--- ३ ग्रॅम

सोडियम बायकार्बोनेट---६ ग्रॅम

पाणी ---- ३५ मि. ली.

कृती : प्रथम सर्व प्रकारची पिठे एकत्र करून त्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट, अमोनिअम बायकार्बोनेट मिसळावे. वनस्पती तूप मऊ होईपर्यंत चांगले फेटून घ्यावे. आणि त्यामध्ये पिठीसाखर मिसळावी.

नंतर मेथीची पेस्ट, कारल्याची पेस्ट, जिरे पावडर टाकून मिसळावे. त्यानंतर दही, पाणी व मीठ मिसळावे. याच मिश्रणात डेक्स्ट्रोजचे द्रावण टाकून शेवटी पिठाचे मिश्रण टाकून त्यांची कणीक मळावी. या मिश्रणाचे मध्यम गोळे घेऊन ते ०.५ सेंमी जाडीचे लाटून कटरच्या साहाय्याने विविध आकाराच्या कुकीज तयार कराव्यात.

कुकीज ओव्हनमध्ये साधारण १८अंश सेल्सिअस तापमानात ८ ते १० मिनिटे चांगली बेक करून घ्यावीत. नंतर सामान्य तापमानात थंड होऊ द्यावीत. प्लास्टिक पिशव्यात किंवा बरणीत भरून त्यांची चांगली जागी साठवण करावी. अशा प्रकारच्या कुकीज १० ते १५ दिवस सामान्य तापमानात चांगल्या स्थितीत राहतात.

संपर्क : सुहेल भेंडवडे, ९८६०७३२८६६, (अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग,प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर,जि.सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com