Cotton Disease : कपाशील लाल्या येण्याची कारणे काय आहेत?

Cotton Redning : कपाशी पिकात काही वेळा पाने लाल होतात. काही शेतकरी याला लाल्या रोग म्हणतात. हे असं का होत. तर लाल्या हा रोग नसून ही एक विकृती आहे जी अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होते.
Cotton Disease
Cotton DiseaseAgrowon
Published on
Updated on

Cotton Crop : कपाशी पिकात काही वेळा पाने लाल होतात. काही शेतकरी याला लाल्या रोग म्हणतात.  हे असं का होत. तर लाल्या हा रोग नसून ही एक विकृती आहे जी अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होते. तर ही विकृती येण्याची कारणे काय आहेत याचीच माहिती आपण घेऊया.

जर तुमच्या कपाशीला नत्र आणि मग्नेशिअम कमी पडत असेल तर कपाशीची पाने लाल होतात. याशिवाय जमिनीतील ओलावा कमी झाला किंवा जास्त पाऊस झाल्यानंतर पिकात पाणी साठून राहील्यानेही कपाशीची पाने लाल होतात.  ही झाली लागवडीनंतर दिसणारी लक्षणे याशिवाय 

जर तुम्ही कापशीची लागवड पाणथळ किंवा चिबड जमिनीत  केली असेल तर झाडांना अन्नद्रव्ये शोषण्यासाठी अडचण येते. चिबड जमिनीत पाण्यासोबत नत्राचाही निचरा होतो. त्यामुळे पिकाला नत्र कमी पडत आणि पाने लाल होतात.  जमिनीतील पाण्याची कमतरता आणि रात्रीच्यावेळी जर तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा जर कमी असेल म्हणजे रात्रीच्यावेळी जर जास्त थंडी असेल तर झाडाच्या पानातील हरितद्रव्ये कमी होऊन अॅन्थोसायनीन हे लाल रंगद्रव्य तयार होतं. त्यामुळेही पाने लाल होतात.

काही शेतकरी काय करतात  कपाशीला आवश्यक असलेले नत्र, स्फुरद आणि पालाश युक्त खते टप्प्याटप्प्याने न देता एकदाच देतात. त्यामुळे पिकाला वाढीसाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळेही पाने लाल होऊ शकतात.  ही झाली कपाशीची पाने लाल होण्याची कारणे.  आता या समस्येवर उपाय करायचे? ते सांगते. 

Cotton Disease
Cotton Disease : कपाशीत लाल्या विकृती येण्याची कारणे

सुरुवातीला इंन्स्टंट उपाय करताना १ टक्का युरीयाची म्हणजेच १०० ग्रॅम युरिया १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. आणि अर्धा टक्का मॅग्नेशिअम सल्फेट म्हणजेच ५० ग्रॅम   मॅग्नेशिअम सल्फेट ची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे काय होतं तर पिकाची नत्र आणि   मॅग्नेशिअम ची गरज भागवली जाते. 

सगळ्यात महत्वाच म्हणजे चिबड आणि हलक्या जमिनीत कपाशीची लागवड करु नका.  आपण जसं एकदाच जेवत नाही थोड थोड खातो तसच पिकाचही असत.   पिकाला एकदाच सगळी खत न देता. गरजेनूसार म्हणजेच वाढीच्या टप्प्यानूसार खत द्या. केवळ रासायनिक खताचा भडिमार न करता शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत आणि जीवाणू खते सुद्धा वापरा त्यामुळे  अपण जी खते देतो ती पिकाला लागू पडतात. तसच जमिनीची पाणी धरुन ठेवण्याचीही क्षमताही वाढते. अशाप्रकारे कपाशीत खताच योग्य जमिनीत लागवड करुन योग्य प्रमाणात खते दिल्यास कपाशीतील लाल्याचा प्रादुर्भाव टाळता येतो.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com