Vegetable Crop : वेलवर्गीय भाजीपाला पिकात मंडप उभारणीचे फायदे काय आहेत?

Vine Crops : भाजीपाला पिकामध्ये लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे आवश्यक असते. त्यातून दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळवणे शक्य होते.
Vegetable Crop
Vegetable CropAgrowon
Published on
Updated on

Vegetable Crop Management : भाजीपाला पिकामध्ये वेलवर्गीय पिकाला महत्व आहे. वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा व घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश होतो. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेवून केली जाते.

लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे आवश्यक असते. त्यातून दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळवणे शक्य होते. 

सामान्यतः वेलीसाठी मंडप किंवा तारेच्या ताटीचा आधार देता येतो. मंडप उभारणी करताना लोखंडी खांबाचा किंवा बांबूचा वापर केला जातो. खांब किंवा बांबू कुजू नयेत, यासाठी जमिनीत गाडल्या जाणाऱ्या भागावर गाडण्यापूर्वी डांबर लावावे.

मंडपाच्या सर्व तारांना सारखा ताण देणे आवश्यक आहे. तारा केवळ हाताने किंवा पकडीच्या साह्याने ओढून पाहिजे तेवढा ताण देता येत नाही. त्यासाठी लोखंडी पुलर व लाकडी पुलरचा वापर करणे फायदेशीर ठरते. 

मंडप पद्धतीमध्ये दोन ओळींतील अंतर १० ते १२ फूट आणि दोन वेलींतील अंतर ३ फूट ठेवावे. एक टोक वेलाचा खोडाजवळ काठीच्या आधाराने बांधावे, तर दुसरे टोक तारेस बांधावे. वेलीची वाढ ५ फूट होईपर्यंत वेलीची बगलफूट काढत राहावी.

मुख्य वेल मंडपावर पोहोचल्यानंतर त्याचा शेंडा खुडावा. राखलेल्या बगलफुटींच्या वाढ होण्यासाठी भर द्यावा. 

मंडप उभारणीचे फायदे

मंडपामध्ये वेली ६ ते ७ महिने चांगल्या राहतात. जमिनीवर केवळ ३ महिने चांगल्या राहतात.

मंडपावर वाढवलेल्या वेलीची वाढ चांगली होते. फळांची संख्या अधिक राहते. उत्पादन अधिक मिळते.

Vegetable Crop
Vegetable Grafting : भाजीपाला कलम तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत?

वेलवर्गीय भाजीपाला पिकाची पाने व फळे यांचा संपर्क जमिनीशी होत नाही. फळाची व्यवस्थित वाढ होऊन फळाचा रंग सारखा व चांगला राहतो. त्यामुळे गुणवत्ताही चांगली राहते.

मंडप पद्धतीमध्ये हवा चांगल्या प्रकारे खेळती राहत असल्याने सडण्याचे, कीड व रोगाचे प्रमाण कमी राहते. फवारणीसुद्धा व्यवस्थित करता येते. 

फळाची तोडणी, खुरपणी ही कामे अत्यंत सुलभ रीतीने होतात. पिकात दोन ओळींमध्ये कमी कालावधीचे १ ते २ महिन्यांचे आंतरपीक उदा. पालेभाज्या, कोथिंबीर, पालक इ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com