Turmeric Management : शेतकरी नियोजन पीक : हळद

गजानन यांनी पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये बदल करून मागील ६ वर्षांपासून बेडवर हळद लागवडीस सुरुवात केली. याशिवाय त्यांच्याकडे केळी ८ एकर, हरभरा ८ एकर, ज्वारी साडेतीन एकर, कापूस २ एकर, कांदा साडेतीन एकर आणि गहू लागवड ३ एकरांवर आहे.
Turmeric Crop
Turmeric CropAgrowon
Published on
Updated on

शेतकरी : गजानन दिगंबरराव भांगे

गाव : पार्डी (म.) ता. अर्धापूर, जि. नांदेड

एकूण क्षेत्र : ५० एकर

हळद क्षेत्र : सहा एकर

गजानन यांनी पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये बदल करून मागील ६ वर्षांपासून बेडवर हळद लागवडीस (Cultivation of Turmeric) सुरुवात केली. याशिवाय त्यांच्याकडे केळी ८ एकर, हरभरा ८ एकर, ज्वारी साडेतीन एकर, कापूस (Cotton) २ एकर, कांदा (Onion) साडेतीन एकर आणि गहू लागवड ३ एकरांवर (Cultivation of wheat) आहे.

नांदेड जिल्ह्यातील पार्डी मक्ता शिवारात (ता. अर्धापूर) येथील गजानन भांगे यांची ५० एकर जमीन आहे. त्यापैकी ८ एकरांमध्ये हळद पीक (Turmeric Crop) आहे. गजानन त्यांचे वडील दिगंबरराव भांगे हे सरीमध्ये हळद लागवड (Turmeric Cultivation) करीत होते.

लागवड नियोजन ः

१) हरभरा आणि कांदा लागवडीतील ८ एकरांवर क्षेत्रामध्ये हळद लागवडीचे नियोजन केले होते. त्यानुसार हरभरा आणि कांदा पीक निघाल्यानंतर ५ जुलैला हळद लागवडीचे नियोजन केले.

२) त्यानुसार लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून एकरी २ ट्रॉली प्रमाणे शेणखत पसरून घेतले. त्यानंतर रोटर मारला.

३) लागवडीसाठी साडेचार फुटांचे बेड तयार केले. बेडवर दोन ओळींत १ फूट आणि दोन बेण्यात ५ ते ६ इंच अंतर राखत झिगझॅग पद्धतीने बेणे लागवड केली.

४) लागवडीसाठी सेलम जातचे एकरी ७ क्विंटल बेणे लागले. लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया करून घेतली.

५) ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे ६ जुलै रोजी हळद बेण्याची लागवड केली.

Turmeric Crop
Crop Advisory : हरभरा, करडई, हळद पिकाची काळजी कशी घ्याल?

खत व्यवस्थापन ः

१) लागवडीनंतर ४० दिवसांनी रासायनिक खतांचा बेसल डोस दिला. त्यात डीएपी १०० किलो, पोटॅश ५० किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो, निंबोळी पेंड एक पोते, अमोनिअम सल्फेट ५० किलो प्रति एकर प्रमाणे खतांचा डोस दिला.

२) लागवडीनंतर १५ दिवसांनी बेडवर ठिबकच्या नळ्या पसरून घेतल्या.

३) त्यानंतर ४५ दिवसांनी ह्यमिक ॲसीड एकरी १ किलो प्रमाणे ठिबकद्वारे दिले.

४) लागवडीनंतर ९० दिवसांनी रासायनिक खतांचा दुसरा डोस दिला. यात १०:२६:२६ हे खत १०० किलो, अमोनिअम सल्फेट ५० किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो, पोटॅश ५० किलो प्रमाणे प्रति एकर साठी मात्रा दिली.

५) लागवडीनंतर १२० दिवसांनी १३:४०:१३ साडेबारा किलो आणि ०:५२:३४ हे विद्राव्य खत १० किलो प्रमाणे दिले.

६) लागवडीच्या १६० दिवसांनी ०:५२:३४ आणि त्यानंतर २० दिवसांनी पोटॅशिअम शोनाईटची मात्रा दिली.

आगामी नियोजन ः

१) सध्या ठिबकद्वारे पाणी देण्याचे सुरू असून, पिकास पाणी देणे हळूहळू कमी केले जाईल. त्यानंतर १५ फेब्रुवारीनंतर पूर्णपणे पाणी देणे बंद केले जाईल.

२) पिकाची पक्वतेची अवस्था पाहून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हळद काढणीस सुरुवात केली जाईल.

गजानन भांगे, ७६२०३ २६३१३ (शब्दांकन : कृष्णा जोमेगावकर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com