Rabi Season : ढगाळ वातावरण ठरतेय कीड, रोगाला पोषक

ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकामध्ये किड, रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
Rabi Crop
Rabi CropAgrowon

बंगालच्या उपसागरातील वादळी वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) झाले आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, उद्यापासून (ता. ९) तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकामध्ये (Rabi Crop) किड, रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. किड, रोगाचे नियंत्रण करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुयात.

Rabi Crop
Weather Update : राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे का ?

तुर पिकातील शेंग अळीच्या नियंत्रणासाठी पाच कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावेत. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. तुरीमधील फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये घाटे अळी, पिसारी पतंग व शेंगमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या किडींचे एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने नियंत्रण करावे. यामध्ये तृण धान्याचे आंतरपीक असल्यास किडीचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते. एचएनपीव्ही या जैविक कीड नियंत्रकाचा वापर करावा. फुलकळी लागताना पहिली फवारणी पाच टक्के निंबोळी अर्क, दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १२ ते १५ दिवसांनी हेलिओकील एचएनपीव्ही ५०० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी करावी. गरजेनुसार तिसरी फवारणी क्लोरएन्ट्रानिलीप्रोल (१८.५ % प्रवाही) १५० मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट २०० ग्रॅम ५०० मिली पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Rabi Crop
Sangali Grapes: सांगलीत द्राक्ष बागांसाठी सध्या पोषक वातावरण

करडई पिकात सध्या ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी मेटारेझीम अॅनिसोप्ली ५० ग्रॅम किंवा डायमीथोएट (३० % प्रवाही) १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला पिकांपैकी वांग्यामध्ये रसशोषक किडी जसे तुडतुडे, पांढरी माशी, मावा या किडींच्या नियंत्रणासाठी १५ मिली किंवा फ्रेनप्रोप्यॅथ्रीन ३० टक्के इसी ५ मिली या कीटकनाशकाच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात अधून मधून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

काकडी व वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये फळमाशीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी १५ ते २० क्युल्युरच्या कामगंध सापळ्याचा वापर करावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com