Aster Cultivation : तंत्र ॲस्टर लागवडीचे...

इतर लहान हंगामी फुलांच्या तुलनेत ॲस्टरची लागवड सोपी, कमी खर्चाची आहे. कमी कालावधीत फुलांची काढणी होत असल्याने एक फायदेशीर फुलपीक आहे.
Aster Cultivation
Aster CultivationAgrowon
Published on
Updated on


आपल्याकडे तिन्ही हंगामात ॲस्टरची लागवड (Aster Cultivation) करता येते. हार बनविणे, फुलदाणी, पुष्पगुच्छामध्ये तसेच लग्नसमारंभ, गणपती उत्सव, दसरा, दिवाळी, नाताळ सणामध्ये ॲस्टर फुलांना चांगली मागणी असते. इतर लहान हंगामी फुलांच्या तुलनेत ॲस्टरची लागवड सोपी, कमी खर्चाची आहे. कमी कालावधीत फुलांची काढणी होत असल्याने एक फायदेशीर फुलपीक (Flower Crop) आहे.

Aster Cultivation
Animal Care : जनावरांचं वजन मोजण्याची ही सोपी पद्धत माहीत आहे का ? | ॲग्रोवन

ॲस्टरसाठी फार कडक थंडी तसेच कडक ऊन मानवत नाही. विदर्भातील उन्हाळा तसेच नाशिक परिसरातील कडक थंडी आणि कोकणातील पावसाचा काळ वगळता वर्षभर लागवड करता येते. या पिकासाठी मध्यम कसदार, पोयट्याची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन मानवते. भारी कसदार जमिनीत वाढ जोमदार होत असली तरी फुले कमी लागतात. चुनखडीयुक्त, दलदलीची जमीन या पिकासाठी उपयुक्त नाही. वरकस व हलक्या जमिनीत वाढ खुंटते, फुले लहान व निस्तेज होतात. त्यामुळे अशा जमिनी लागवडीसाठी निवड करू नये. लागवड वर्षभरात कधीही करता येते. तरीही हंगाम, जात आणि स्थानिक हवामानाचा विचार करून बाजारातील मागणीनुसार लागवड करावी.बाजारपेठ लक्षात घेऊन जून-जुलै, ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि फेब्रुवारी-मार्च महिन्यांत लागवड करावी

Aster Cultivation
Garlic Cultivation : तंत्र लसूण लागवडीचे...

सुधारित जाती आणि प्रकार :
फुले येण्याच्या कालावधीनुसार हळवी, निमगरवी आणि गरवी असे प्रकार पडतात. हळव्या प्रकारात फुलांचा कालावधी तीन महिने, निम गरवा प्रकारात चार महिने आणि गरव्या प्रकारात चार ते पाच महिन्यांचा कालावधी असतो. फुलांचा रंग आणि बाजारातील मागणीचा विचार करून योग्य जातींची लागवड करावी.

Aster Cultivation
Grass Cultivation : सकस चाऱ्यासाठी बहुवार्षिक गवतांची लागवड

अ.क्र. --- जात ---वैशिष्ट्ये
१---फुले गणेश व्हाइट---लांब दांड्याची शुभ्र पांढऱ्या रंगाची फुलदाणीत जास्त काळ टिकणारी फुले, हेक्टरी ४० ते ५० लाख सुट्या फुलांचे उत्पादन.
२---फुले गणेश पिंक---फुलावर लवकर येणारी,निमपसरी,आकर्षक गुलाबी रंगाची फुले, हेक्टरी ४० ते ४२ लाख फुले.
३---फुले गणेश व्हायोलेट---निमपसरी, फुलांवर लवकर येणारी, गडद जांभळ्या रंगाची फुले, हेक्टरी ५० ते ६० लाख फुले.
४---फुले गणेश पर्पल---फिक्कट जांभळ्या रंगाची आकर्षक फुले, हेक्टरी ४० ते ४५ लाख फुले.
५) बेंगलुरू येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने विकसित केलेल्या जाती ः अर्का कामिनी, अर्का पूर्णिमा, अर्का शशांक आणि अर्का व्हायोलेट.

रोपवाटिका :
१ ) रोपनिर्मितीसाठी २ × १ मीटर आकाराचे गादीवाफे तयार करावेत. वाफ्याची उंची १० सेंमी ठेवावी.
२) बारीक माती आणि चांगले कुजलेले शेणखत मिसळून वाफे बनवावेत. तयार वाफ्यावर १० ते १२ सेंमी अंतरावर ओळीत बी पेरावे. बी पेरण्यासाठी लांबीला आडव्या ओळी ओढाव्यात.
३) एक सेंमीपेक्षा जास्त खोल बी पेरू नये. हलक्या हाताने खत, माती मिश्रणाने बी झाकावे. नंतर झारीने हलके पाणी द्यावे. बी उगवणीनंतर रोपांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, खुरपणी करावी.
४) रोपवाटिकेत रोग नियंत्रणासाठी २५ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दहा दिवसांच्या अंतराने दोन वेळा आळवणी करावी.
५) ३० ते ४० दिवसांनी रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात.

लागवडीचे अंतर :
१) लागवडीसाठी ६० सेंमी अंतराने सरी वरंबे तयार करावेत किंवा सपाट वाफ्यात लागवड करावी.
२) ३० सेंमी × ३० सेंमी किंवा ३० सेंमी × ६० सेंमी अंतरावर लागवड करावी. लागवडीचे अंतर हे जात, हंगाम आणि जमिनीवर अवलंबून असते.
३) बाजारातील मागणी लक्षात घेऊन लागवडीचे नियोजन करावे. एकदम लागवड न करता १५ दिवसांच्या अंतराने थोडी थोडी लागवड करावी.

आंतरमशागत ः
१) लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली खुरपणी करावी. नंतर प्रति हेक्टरी नत्राचा दुसरा हप्ता ५० किलो या प्रमाणात द्यावा.
२) रोपाला मातीची भर द्यावी. त्यामुळे खोडाला चांगला आधार मिळतो. फुले लागल्यानंतर झाड कोलमडत नाही. झाड सरळ वाढते. फुले खराब होत नाहीत.
३) लागवडीपासून अडीच ते चार महिन्यात फुले लागतात. पूर्ण फुले उमलल्यानंतर काढावीत.

अन्नद्रव्य व्यवस्थापन ः
१) जमीन तयार करताना हेक्टरी २५ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. माती परीक्षणानुसार प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद, १०० किलो पालाश द्यावे.
२) लागवडीच्या वेळी पूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे. उर्वरित अर्धे नत्र लागवडीनंतर एक महिन्यांनी द्यावे. लागवडीच्या वेळेस शेणखताबरोबर १:१० या प्रमाणात फेरस सल्फेट २० किलो आणि १० किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी द्यावे.

पाणी व्यवस्थापन :
१) जमिनीचा प्रकार, वातावरण आणि हंगामानुसार पाणी व्यवस्थापन करावे.
२) पिकाच्या मुळ्या मातीच्या वरच्या थरात असतात. पिकाला साधारणतः ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे .
३) कळी अवस्था ते फुले काढणीपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास चांगले पीक येते.
४) पिकाची वाढ, जमिनीचा प्रकार विचारात घेऊन गरजेनुसार एक किंवा दोन दिवसाआड ठिबकद्वारे पाणी द्यावे.
---------------------------------------------------------------------
संपर्क ः डॉ. मोहन शेटे, ९४०३४८९२२९
(विभागीय कृषी संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com