Grape Crop Care : प्रतिकूल हवामानात घ्या द्राक्ष पिकांची काळजी

पोटॅश, कॅल्शिअम, फॉस्फरस या अवस्थेत अत्यंत आवश्यक असते. सध्या थंडीमुळे ते मण्यांत शोषले जात नाही, त्यामुळे त्याच्या कमतरतेच्या विकृती द्राक्ष मण्यांमध्ये दिसून येतात.
Grape Crop Care
Grape Crop CareAgrowon

डॉ. स. द. रामटेके, रवींद्र कौर

गेल्या काही दिवसांपासून सर्वच द्राक्ष विभागात (Grape) थोड्याफार फरकाने तापमानात (Temperature) मोठी घट झालेली दिसून येते. या कालावधीत वेलीच्या चयापचय क्रिया मंदावल्यामुळे द्राक्ष उत्पादनावर (Grapes Production) विपरीत परिणाम दिसून येतात. हा परिणाम कशा प्रकारे कमी करता येईल, या विषयी या लेखामध्ये माहिती घेऊ.

थंड हवामानाचा द्राक्षवेलीवर होणारा परिणाम (Cold Weather Effect)

१) मुळांची वाढ मर्यादित होते किंवा नवीन मुळांची निर्मिती होत नाही यामुळे पाने लहान राहातात, त्यांची जाडी कमी राहते. आणि शेंड्याची वाढ पूर्णपणे थांबते.

२) वेलीची वाढ खुंटते. खोडांची जाडी कमी होते. त्यांचा विस्तार मर्यादित राहतो. द्राक्षमण्यांचा रंग बदलतो.

३) पर्णरंध्रे बराच काळ बंद राहत असल्यामुळे प्रकाश संश्लेषण कमी होते. श्‍वासोच्छ्वास (रेस्पिरेशन) वाढते. अन्नद्रव्यांचे वहन कमी होते. वेलीची उपासमार होते.

त्यामुळे द्राक्ष मण्यांची वाढ थांबते आणि आकारही वाढत नाही. परिणामी, द्राक्षांची प्रत खालावते.

४) पोटॅश, कॅल्शिअम, फॉस्फरस या अवस्थेत अत्यंत आवश्यक असते. सध्या थंडीमुळे ते मण्यांत शोषले जात नाही, त्यामुळे त्याच्या कमतरतेच्या विकृती द्राक्ष मण्यांमध्ये दिसून येतात.

५) सायटोकायनीनची उपलब्धता कमी होते. हरितद्रव्याचे प्रमाण कमी होते. फेनॉल निर्मिती मण्यात होते, त्यामुळे रंगीत जातीमध्ये मण्यांना रंग चांगला येतो. मात्र हिरव्या द्राक्षात पिंक बेरीसारखी विकृती दिसून येते.

६) प्रामुख्याने मण्यात पाणी उतरण्यापासून ते साखर भरण्याची अवस्था या कालावधीमध्ये मणी सुकण्याची विकृती (ममीफिकेशन) दिसून येते. या विकृतीमध्ये मण्याचे देठ सुकायला सुरुवात होते.

खरेतर याची सुरुवात मण्याचा आकार सहा-सात मिमी असल्यापासून होते. सुरुवातीला सूक्ष्म असा डाग काही मण्यांच्या देठावर दिसतो. मण्यांच्या वाढीबरोबर डागांचे प्रमाण वाढत जाऊन शेवटी पूर्ण पाकळी किंवा घड सुकायला सुरुवात होते.

थंडीच्या कालावधीत जमिनीत पुरेशा प्रमाणात कॅल्शिअमची उपलब्धता असूनही फळधारणा कालावधीत वेलींना कॅल्शिअमची कमतरता दिसून येते.

Grape Crop Care
Grape Disease Management : द्राक्ष बागेतील भुरी रोगाचे व्यवस्थापन

७) वॉटर बेरीज येण्याची कारणे मण्यांचे अयोग्य पोषण किंवा सर्व मण्यांचे अपूर्ण पोषण हे मुख्य कारण आहे. वेलीच्या उत्पादन क्षमतेपेक्षा जास्त घड किंवा घडात मण्याची संख्या जास्त ठेवल्यास ‘वॉटर बेरीज’ तयार होतात.

पाणी उतरण्याच्या अवस्थेमध्ये जास्त थंडी व वेलीच्या कमी विस्तारामुळे देखील वॉटर बेरीज तयार होऊ शकतात. थंडीमध्ये पांढऱ्या मुळांची वाढ नियमितपणे होणे आवश्यक असते.

त्यासाठी मुळांच्या कार्यक्षेत्रात वाफसा राहील, याची काळजी घ्यावी. पाण्याचा ताण देणे टाळावे. यामुळे तापमान नियंत्रणात राहून मुळांची वाढ योग्य प्रकारे होते. या कालावधीत बागेत आच्छादनाचा वापर केल्यास खूप फायदा होतो.

८) सोबतच जमिनीतून आफ्रिकन समुद्र शैवालांचा वापर (Ecklonia maxima) किंवा तत्सम अन्नद्रव्याचा वापर करावा. पांढऱ्या मुळांची वाढ जलद गतीने होते.

वेलीमध्ये सायटोकायनीनची पातळी वाढून पानांची कार्यक्षमता वाढते. त्याचा अपेक्षित परिणाम होऊन थंडीमध्ये मंदावलेला अन्न निर्मितीचा वेग वाढतो. अन्नपुरवठा सुरळीत होऊन मण्यांची वाढ अपेक्षेप्रमाणे मिळण्यास मदत होते.

९) फवारणीद्वारे समुद्री शैवालांचा वापर केल्यास त्यातील प्रमुख घटक अल्जिनिक ॲसिड या पॉलीसॅकराइड हे कॅल्शिअम सोबत बंध निर्माण करते.

अल्जिनिक ॲसिड हे ऋणभारीत असून, त्यातील नैसर्गिक ऑक्सिजनमुळे पेशी द्रव्यात मुक्त कॅल्शिअमचे प्रमाण जलद गतीने वाढते. त्यामुळे पेशीची लवचिकता व मजबुती वाढविण्यास मदत होते.

१०) मण्यांचा सुकवा आणि वॉटर बेरीज यांची समस्या उद्भवू नये, यासाठी सुरुवातीपासूनच अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करणे गरजेचे असते.

मात्र कोणत्याही अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास त्या त्वरित दूर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित खते वापरल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत होते.

Grape Crop Care
Grape Cluster : द्राक्ष समूह प्रकल्पासाठी अखेर ‘सह्याद्री’ची निवड

उदा. नवीन उत्पादनामध्ये फॉस्फरस, पोटॅशिअम मॉलिब्डेनम यासारखे सूक्ष्म अन्नद्रव्ये असून, त्यांचा वापर फायदेशीर ठरतो. ९: ४६, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम यांचाही वापर फवारणीद्वारे करता येतो. फक्त त्यासाठी दर्जेदार उत्पादनांचा वापर करणे गरजेचे असेल.

डॉ. स. द. रामटेके, ९४२२३१३१६६, (राष्‍ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com