Zero Tillage: शून्य मशागत तंत्रातील महत्वाचे टप्पे

जमिनीवर शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करावयाचा आहे त्या जमिनीतील मातीचे परीक्षण करून घ्यावे
SRT Technology
SRT TechnologyAgrowon
Published on
Updated on

शून्य मशागतीचा अवलंब केल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढत असून जमिनीची सुपीकता चांगली राहते परिणामी उत्पादनामध्ये वाढ होते. पुढील टप्प्यांनूसार शून्य मशागत तंत्राने पिकाची लागवड करावी. जेणेकरून शुन्य मशागत तंत्राचा योग्य प्रमाणात फायदा मिळेल.

SRT Technology
शून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची शेती !

१. जमिनीचा सेंद्रिय कर्ब तपासणे
ज्या जमिनीवर शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करावयाचा आहे त्या जमिनीतील मातीचे परीक्षण करून घ्यावे आणि सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणाची नोंद ठेवावी.

२. गादी वाफा तयार करणे
पहिल्या हंगामात फक्त गादी वाफे तयार करून घ्यावेत. यासाठी मजुरांमार्फत, बेड मेकरद्वारे किंवा बीबीएफ द्वारे वाफे करावे. गादी वाफ्याचा आकार ४.५ फुट रुंदी व अर्धाफुट उंची असा असावा. पिकाच्या प्रकारानुसार आणि ओळींच्या संख्येनुसार वाफ्याच्या रुंदीमध्ये आवश्यकतेनुसार थोडासा बदल करावा.

३. टोकण पद्धतीने लागवड करणे
गादी वाफ्यावर बियाण्याची टोकण करावी. बियाणे व खते एकत्रपणे टोकावीत. बियाण्याची टोकण मजुरांमार्फत, टोकण यंत्रामार्फत किंवा टोकण साचा वापरून करावी.

SRT Technology
एसआरटी’ तंत्रामुळे भाताची एकरी पाच क्विंटल वाढ

४. तणनाशकाची फवारणी
पिकाच्या लागवडीनंतर व उगवणीपुर्वी शिफारशीत तणनाशक फवारावे. उभ्या पिकात तणांचा प्रादुर्भाव वाढल्यास शिफारस केलेली निवडक तणनाशके वापरावीत. कोणत्याही परिस्थितीत तणे उपटून काढू नयेत. तसेच निंदणी, भांगलणी किंवा कोळपणी करू नये.

५. आंतरमशागतीची कामे करू नये
पीक वाढीच्या अवस्थेत कीड व रोगाचे व्यवस्थापन करावे तसेच आवश्यकतेनुसार सिंचन व्यवस्थापन करावे. कोळपणी, डवरणी, भर घालणे इ. आंतरमशागतीची कामे करण्याची गरज नाही.

६. कापणी करून पिकांची काढणी
काढणीच्यावेळी पिके कोणत्याही परिस्थितीत जमिनीतून उपटू नये, तर त्यांची कापणी करावी आणि धसकटे व मुळांचा भाग तसाच ठेवावा.

७. त्याच वाफ्यावर पुढील पिकाची लागवड
पहिल्या हंगामात वाफे न मोडता अगोदरचे पीक कापल्यानंतर तणनाशकाची फवारणी करून पुढील पिकाची टोकण करावी. गरज पडल्यास वाफ्यांची डागडुजी करावी.

८. जमिनीची मशागत न करणे
कोणत्याही परिस्थितीत नांगरणी, कुळवणी, कोळपणी अशा प्रकारची मशागतीची कामे करु नयेत. या तंत्राने जमिनीमध्ये गांडूळांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने आणि जिवाणूंचे प्रमाण वाढल्याने जमिन भूसभूशीत राहते. मशागतीचा उद्देश गांडुळे पूर्ण करतात.
----------
स्त्रोत ः शून्य मशागत तंत्र पुस्तिका ः विजय कोळेकर, कृषि विद्यावेत्ता, पोकरा, मुंबई

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com