Madhavrao More: शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माधवराव मोरे यांचे निधन

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, मुलूखमैदानी तोफ माधवराव खंडेराव मोरे ऊर्फ नाना यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी बुधवार (ता.२) रोजी सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी पिंपळगाव बसवंत (ता.निफाड) येथे अखेरचा श्वास घेतला.
Madhavrao More
Madhavrao More Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

नाशिक: शेतकरी संघटनेचे (Shetkari Sanghatana) ज्येष्ठ नेते, मुलूखमैदानी तोफ माधवराव खंडेराव मोरे (Madhavrao More ) ऊर्फ नाना यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी बुधवार (ता.२) रोजी सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी पिंपळगाव बसवंत (ता.निफाड) येथे अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठ-दहा दिवसात त्यांची प्रकृती वृद्धापकाळाने खालावली होती.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

१९८० मध्ये शेतकरी संघटनेची आंदोलनाची ठिणगी (कै.)शरद जोशी यांनी नाशिकच्या भूमीवर प्रज्वलित केली.त्यांच्यासमवेत ते संघर्षात सोबत होते.अभ्यासू,प्रयोगशील व लढवय्या शेतकरी म्हणून त्यांची राज्यभरात ओळख राहिली. १९८८ साली पिंपळगाव बसवंत येथे ‘पिंपेन’ या ब्रॅण्ड खाली वायनरी उद्योग उभा केला होता.शेतकरी संघटना उच्चाधिकार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

१९८० च्या काळात शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांच्या सोबतीने संघटनेत ते सक्रिय झाले होते.

शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा. कृषिमुल्य आयोग बरखास्त करा."कांद्याला मंदी तर ऊसाला बंदी" या मागणींसाठी अभुतपुर्व असे संपुर्ण राज्यभर मोठे आंदोलन उभारले होते.ऊस,कांदा या शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी संपूर्ण राज्यात शरद जोशी व त्यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेरोको, रास्तारोको आंदोलने झाली होती.तर शेतकरी आंदोलन चिरडण्यासाठी त्यावेळी सरकारकडून लाठीमार,अश्रुधुर,गोळीबार यांचा वापर केला होता.

यावेळी झालेल्या लाठी हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तरीही शेतकरी आंदोलनाची धार कमी न होता वाढतच गेली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांनी शरद जोशी, माधवराव खंडेराव मोरे,राज्य साखर संघाचे तत्कालीन अध्यक्ष स्व.माधवराव बोरस्ते व इतर प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते‌.

Madhavrao More
Raju Shetty : कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाइन करा

या प्रयत्नांची फलश्रुती म्हणजे १९८० साली पहिल्यांदाच ऊसाला ३०० रुपये प्रतिटन तर कांद्याला १०० रूपये क्विंटल भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकरी संघटित झाल्याने गावागावात पोहचली.

त्यांचे चिरंजीव विक्रम व विश्वासराव यांच्याशी संपर्क साधून नानांच्या तब्बेतीची राज्यातील शेतकरी चळवळीत नेत्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com