कांदा उत्पादनासह बीजोत्पादनातून प्रगती

तरुण शेतकऱ्याने अभ्यासपूर्ण शेती व सेंद्रिय, जैविक व्यवस्थापनावर भर देत कांद्याचे एकरी १२ ते १४ टन उत्पादकतेपर्यंत मजल गाठली आहे.
Onion Seed
Onion SeedAgrowon

नगर जिल्ह्याला लागून मात्र बीड जिल्ह्यातील दुष्काळी बावी (ता. आष्टी) येथील वैभव गोल्हार या तरुण शेतकऱ्याने अभ्यासपूर्ण शेती व सेंद्रिय, जैविक व्यवस्थापनावर भर देत कांद्याचे एकरी १२ ते १४ टन उत्पादकतेपर्यंत मजल गाठली आहे. अलीकडील काळात कांदा बीजोत्पादनातही नाव मिळवत सुमारे दोन ते अडीच एकरांत क्षेत्र वाढवले आहे.


नगर व शेजारील बीड जिल्ह्यात अलीकडील काळात कांदा उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा (Farmers towards onion production) कल वाढला आहे. खास करून कमी पाणी उपलब्धता असलेल्या दुष्काळी भागातच कांद्याला शेतकरी प्राधान्य देत आहेत. नगर पासून सुमारे ७० किलोमीटवरील बावी (ता. आष्टी) येथील वैभव आबासाहेब गोल्हार हे बीए, बीएडपर्यंत शिक्षण झालेले तरुण शेतकरी आहेत. वडील पंधरा वर्षांपासून शेतीसोबत गावात दूध संकलना व्यवसाय करतात. वैभव यांचे भाऊ वैष्णव दिल्लीत वैद्यकीय शिक्षण, नामदेव हरिद्वार येथे आध्यात्मिक शिक्षण तर बहीण वैष्णवीही उच्च शिक्षण घेत आहे. घरची पंधरा एकर शेती आहे.
घर व शेतीची जबाबदारी पडल्याने वैभव यांनी शिक्षणानंतर नोकरी न करता शेतीच करण्याचा निर्णय घेतला.

दुष्काळातही प्रगतीचे प्रयत्न (Efforts to make progress even in drought)

बावी हा अत्यंत कमी पावसाचा भाग आहे. साहजिकच पाण्याचे दुर्भिक्ष असते. मात्र हिंमत न हारता वैभव यांनी पीक (Crop) पद्धती, त्याचा अभ्यास, उत्तम नियोजन व व्यवस्थापन सांभाळून शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. जमीन हलक्या प्रतीची, डोंगराळ आहे. पूर्वी पारंपरिक ज्वारी, बाजरी, हुलगे, उडीद यासारखी पिके ते घेत. मात्र मनासारखे उत्पादन व उत्पन्न (Production and income) मिळत नसल्याने
आठ ते दहा वर्षांपूर्वी पीक पद्धतीत बदल करुन ते कांदाशेतीकडे वळले. चिकाटीने त्यात प्रगती साधत आज इतकी वर्षे या पिकात सातत्य ठेवण्यात त्यांना यश आले आहे.

Onion Seed
उन्हाळ कांदा साठवण करण्यावर शेतकऱ्यांचा भर

कांदा बीजोत्पादनाला प्राधान्य (Preference for onion seed production)

दरवर्षी कांद्याचे क्षेत्र पाच ते सहा एकरांच्या आसपास असते. पूर्वी वैभव चार ते पाच गुंठ्यात कांदा बीजोत्पादनही घेत. अलीकडील वर्षांत बहुतांश भागात कांद्याचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्यासोबत बियाण्याचा प्रश्‍नही तयार होत आहे. पैसे खर्च करूनही कांद्याचे खात्रीशीर बियाणे मिळत नसल्याची उदाहरणे आहेत. सदोष बियाण्यामुळे (Onion seed) अनेक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. त्यामुळे दर्जेदार बियाण्यांची मागणी ओळखून वैभव यांनी तीन वर्षांपासून लाल नाशिक वाणाचे बीजोत्पादन (Seed Production) घेण्याला प्राधान्य दिले आहे. गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादित होत असल्याने आगाऊ मागणी त्यांच्याकडे सुरू होते. बियाण्याची उगवणक्षमता चांगली राहते.

बीजोत्पादनातील बाबी

वैभव यांनी तीन वर्षांपूर्वी बीजोत्पादनाचा विस्तार केला. पहिल्या वर्षी दीड एकर, त्यानंतर दोन एकर व यंदा अजून वाढ करीत हे क्षेत्र अडीच एकरांवर नेले आहे. एकरी सुमारे ३५० किलोपर्यंत
उत्पादन मिळत आहे. यंदा ते ३७५ किलोपर्यंत मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रति किलो दोन हजार ते २२०० रुपये दराने स्थानिक शेतकऱ्यांना (Farmer) विक्री होत आहे. यंदा हा दर २५०० रुपयांपर्यंत अपेक्षित आहे. मशागत, लागणारा कांदा, खते, फवारणी, मजुरी व अन्य बाबींसाठी एकरी एक लाख रुपये खर्च येतो. घरच्यासाठी लागणारे बियाणे (Seed) शिल्लक ठेवून विक्रीतून मिळणारी रक्कम पाहता एकरी एक ते दोन लाख रुपयांपर्यंत नफा शिल्लक राहतो. जागेवरच विक्री होत असल्याने वाहतुकीचा खर्चही वाचत आहे.

Onion Seed
बुलडाण्यात बीजोत्पादनाचा भार महिलांच्या ‘हातात’ ! 

बीजोत्पादनातील ठळक बाबी (Highlights of Seed Production)

-खरीप, रब्बी दोन्ही हंगामांत लाल नाशिक कांदा उत्पादन. (Red Nashik onion production in both kharif and rabi seasons) त्यानंतर उन्हाळ्यात बीजोत्पादन (जानेवारीत). रब्बीत काढलेल्या कांद्यातील एकसारख्या आकाराचा व डेंगळा नसलेला
कांदा प्रति गुंठा ५० किलोप्रमाणे निवडतात.
-सोयाबीन काढणी (Soybean harvesting) झाल्यानंतर डिसेंबरमध्ये नांगरट करून शेत तयार केले जाते. त्यानंतर एकरी दीड क्विंटल सुपर फॉस्फेट, ५० किलो डीएपी व १०-२६-२६ हे ५० किलो असा वापर. चार फुटांवर बेड तयार केले जातात.
-ठिबक वापरून लागवडीसाठी दोन्ही बाजूंनी दोन ठोंबात एक फूट व दोन ओळीत चार फूट अंतर.
निवडलेल्या कांद्याचा २५ टक्के भाग काढून टाकून ७५ टक्के भागाची लागवड.
त्यासाठी कापलेला कांदा (Cut Onion) दोन दिवस सुकवून चौथ्या दिवशी लागवड केल्यास गोटाला बुरशी लागत नाही. मात्र कापणी केल्यानंतर लगेच कांदा लावला तर पाणी दिल्यानंतर ३० टक्क्यांपर्यत गोटाचे नुकसान होऊन वाया जात असल्याचा वैभव यांचा अनुभव.
- उन्हाळ्यात साधारणपणे दर दोन दिवसांनी ठिबकने दीड तास पाणी. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी नियोजनात बदल.
-फुलकिडी वा अन्य किडी-रोगांच्या (Insect-borne diseases) नियंत्रणासाठी शक्यतो जैविक घटकांचाच वापर होतो.
-पांढरी मुळी तयार होण्यासाठी ह्युमिक ॲसिड दर महिन्याला एकरी एक किलो.


मधमाश्‍यांसाठी (For bees)

कांदा बीजोत्पादनात मधमाशीचे अत्यंत महत्त्व असते. रासायनिक कीडनाशकांचा (chemical pesticides) वापर शक्यतो नसतोच. मात्र माश्‍यांना आकर्षित करण्यासाठी आणि परागीकरण वाढीसाठी तीन किलो गूळ, तीन किलो ताक व १०० ग्रॅम वेलची यांचे मिश्रण प्रति १० लिटर पाण्यात केले जाते. दुसऱ्या दिवशी फवारणीला पंपाला एक लिटर असे प्रमाण घेऊन फवारणी घेतली जाते. एका फवारणीत संख्या वाढली नाही तर दुसरी फवारणी घेण्यात येते.

संपूर्ण कुटुंब राबते शेतीत

स्वतः वैभव, वडील आबासाहेब, आई मंगल, पत्नी स्वाती असे चौघेही शेतात राबतात. कुटुंबातील
एकोपा व श्रमांची विभागणी होत असल्याने शेती सुकर झाली आहे. गरजेच्या वेळी स्वतः स्वातीदेखील ट्रॅक्टर चालवतात. राज्य, देशातील कांदा (Indian Onion) उत्पादन व दर यांचा अंदाज याबाबतचा त्यांचा अभ्यासही चांगला आहे. कल पाहून ते सोलापूर, नगर आदी भागांत कांदा विक्री करतात. यंदा त्यांच्या कांद्याला किलोला किमान १८ तर कमाल ३३ रुपये दर मिळाला.

ज्वारी, तुरीतही यश (Sorghum, success in the trumpet)

मागील दोन वर्षांत ठिबकवर तूर घेतली. पाच फुटांवर ठिबक, त्याच्या दोन्ही बाजूंस
लागवड केली. व्यवस्थापनातून दोन वर्षांपूर्वी एकरी १४ क्विंटल, तर गेल्या वर्षी १२ क्विंटल उत्पादन मिळाले. यंदा पारंपरिक बियाणे (Seeds) आणि व्यवस्थापनातून ज्वारीचे एकरी साडेबारा क्विंटल उत्पादन मिळाले. अत्यंत दर्जेदार उत्पादन असल्याने बाजारपेठेत (Market) त्यास ३६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याचे वैभव यांनी सांगितले.

संपर्क : वैभव गोल्हार, ९४२०४१२९००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com