Millet Diet : पौष्टिक आहारासाठी तृणधान्ये उपयुक्त

भरडधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळे, भगर, कोडो, सावा, कुटकी इत्यादींचा समावेश होतो.
Millet Cultivation
Millet Cultivation Agrowon
Published on
Updated on

अर्चना महाजन, डॉ. एस. जे. गावित

Millet : भरडधान्यांमध्ये ज्वारी (Jowar), बाजरी (Millet), नाचणी (Ragi), राळे, भगर, कोडो, सावा, कुटकी इत्यादींचा समावेश होतो.

भरडधान्यांतून आरोग्यास उपयुक्त असलेली अनेक जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. तसेच याच्या सेवनातून क्षार, ऊर्जा मिळते. त्यासाठी आहारात भरडधान्यांचा वापर वाढविणे आवश्यक आहे.

ज्वारी ः

हाडे मजबुती तसेच वनज नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त. रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत पार पाडण्यास मदत करते. अँटिऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असल्याने शरीरातील फ्री रॅडिकल्स बाहेर काढत्यासाठी उपयुक्त. शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

बाजरी ः

बाजरीमध्ये उष्मांक जास्त असल्यामुळे थंडीमध्ये शरीरात उष्णता वाढवण्यास फायदेशीर आहे. बाजरीतील पोषक तत्त्वांमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी व रक्तदाब नियंत्रित राखला जातो. दैनंदिन आहारात बाजरी सेवन केल्यामुळे हाडांना मजबुती मिळते. हृदयाचे आरोग्य राखले जाते.

Millet Cultivation
Nutritious Millet : पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व

नाचणी ः

लहान मुलांसाठी शक्तिवर्धक म्हणून नाचणीला ओळखले जाते. वजन नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरते. लोहाचा उत्तम स्रोत असल्यामुळे गरोदर महिलांच्या पोटातील गर्भाचा विकास होण्यास मदत होते.

कॅल्शिअमचा उत्कृष्ट स्रोत असल्याने हाडे तंदुरुस्त होतात. नाचणी पित्तशामक म्हणून उत्तम काम करते. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी पोषक आहार म्हणून नाचणी खाण्याचा सल्ला दिला जातो.

राळा (कांगणी) ः

राळामधील लोह आणि कॅल्शिअम हाडे मजबूत राखण्यास मदत करतात. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास उपयुक्त. मज्जासंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. पचनसंस्था चांगली राहते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

भगर (बार्टी) ः

प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून भगर ओळखली जाते. पचनास हलकी असल्याने फायदेशीर. भगरमधील नियासीन (B३) जीवनसत्त्वामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

रक्तातील शर्करेची व लिपीडची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. भगर ही ग्लुटेनमुक्त असल्याने ॲलर्जीची समस्या असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे.

सावा (कुटकी) ः

यामध्ये तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी मानले जाते. बद्धकोष्ठता आणि पोटाच्या विकारांवर उपयुक्त आहे. शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

Millet Cultivation
Millet Production : महोत्सवातून तृणधान्याच्या उत्पादनवाढीला प्रोत्साहन मिळेल

कोडो (कोद्रा)

तंतुमय पदार्थांचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पचनास अत्यंत हलके असते. अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले आहे. मधुमेही रुग्णांच्या आहारात भाताला पर्याय म्हणून कोडो या भरडधान्याचा वापर करता येतो.

अर्चना महाजन, (सहायक प्राध्यापक, कृषिविद्या विभाग, डॉ. गंगाधरराव पाथ्रीकर कृषी महाविद्यालय, पाथ्री, जि. औरंगाबाद)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com