चाकणच्या बाजारात लिंबू अडीचशे रुपये किलो

नगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदा, श्रीरामपूर, राहाता या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात लिंबाचे उत्पादन घेतले जाते
lemon
lemonAgrowon
Published on
Updated on

चाकण, जि. पुणे : चाकणच्या महात्मा फुले बाजारात लिंबाचे भाव (Prices of lemons in Mahatma Phule Bazaar) गगनाला भिडले आहेत. यंदा तर लिंबाने मागील सर्व विक्रम मोडून भाव दोनशेच्या पार गेले आहेत. आज रविवारी (ता. १७) लिंबाला दोनशे ते अडीचशे रुपये एका किलोला भाव मिळाला.
नगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदा, श्रीरामपूर, राहाता या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात लिंबाचे उत्पादन घेतले जाते. या लिंबाचे कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lemon Agricultural Produce Market Committee) मोठ्या प्रमाणावर लिलाव होतात. बाजार समितीत आणि जागेवर शेतकऱ्यांना या वर्षी चांगला भाव मिळत आहे. मात्र, यंदा वातावरणातील बदलामुळे लिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.

lemon
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव; दर सुधारले

उत्पादन कमी असल्याने चांगला भाव मिळूनही शेतकऱ्यांचा (Farmer) योग्य फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परराज्यातून मोठ्या प्रमाणावर लिंबू महाराष्ट्राच्या बाजारात येत आहे.
या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना (Farmer) न होता तो व्यापाऱ्यांना जास्त होतो हे वास्तव आहे. त्यामुळे ग्राहकांनाही कमी दरात लिंबू (lemon) मिळत नाही. नगर जिल्ह्यातून जयपूर, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, तमिळनाडू या भागातूनही लिंबांना मोठी मागणी आहे. यंदा ती वाढली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस लिंबाला (lemon) एका किलोला २५ ते ३० रुपये भाव मिळत होता. सध्या भाव वाढले असले तरी तेवढे उत्पादन वाढलेले नाही. ज्या शेतकऱ्यांकडे जास्त उत्पादन आहे, अशा मोजक्याच शेतकऱ्यांना (Farmer) या भाव वाढीचा फायदा होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com