Mango Crop Management : शेतकरी नियोजन पीक: हापूस आंबा

गुहागर येथील शेखर शिवाजीराव विचारे यांनी कृषी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर १९९३ मध्ये स्वतःच्या आंबा बागायतीकडे लक्ष देण्यास आरंभ केला. त्यांच्याकडे १५ एकर शेती असून, त्यापैकी ८ एकरावर हापूस आंबा तर २ एकरावर काजू लागवड केली आहे.
Mango Farm Management
Mango Farm ManagementAgrowon

शेतकरी ः शेखर शिवाजीराव विचारे

गाव ः मोडकाआगार, ता. गुहागर, जि. रत्नागिरी

एकूण शेती ः १५ एकर

हापूस आंबा क्षेत्र ः हापूस ८ एकर

Mango Farm Management: गुहागर येथील शेखर शिवाजीराव विचारे यांनी कृषी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर १९९३ मध्ये स्वतःच्या आंबा बागायतीकडे (Mango Orchard) लक्ष देण्यास आरंभ केला.

त्यांच्याकडे १५ एकर शेती (Mango Farming) असून, त्यापैकी ८ एकरावर हापूस आंबा तर २ एकरावर काजू लागवड (Mango Cultivation) केली आहे.

Mango Farm Management
Mango Board : काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’

सुरुवातीपासूनच त्यांनी हापूस निर्यातीसाठी प्रयत्न केले. त्यासाठी सेंद्रिय प्रमाणीकरण करून घेतले. त्यामुळे व्यवस्थापनाची जबाबदारी वाढली. आंबा बागेत शेणखत, गांडूळ खताचा वापर करून त्यांनी योग्य नियोजनावर भर दिला. प्रमाणीकरणासाठी सलग चार वर्षे ऑडिटही करून घेतले.

१९९८-९९ ला अपेडाकडे बागेची नोंदणी केली. त्यानंतर सेंद्रिय निविष्ठांच्या वापरावर भर देत गुणवत्तापूर्ण हापूस ग्राहकांना उपलब्ध करून देत आहेत.

Mango Farm Management
Devgad Hapus Mango : देवगड हापूस मुंबईत दाखल

व्यवस्थापनातील बाबी

मागील हंगामात १० जूनपर्यंत आंबा सुरू होता. हंगाम संपल्यानंतर बागेची साफसफाई करून घेतली. बागेतील सुका पालापाचोळा, नारळाच्या झावळ्याचा बारीक चुरा करून त्यावर जिवाणू खतांचा वापर केला जातो.

त्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक सूक्ष्म जिवाणूंचे मिश्रण मिसळून १५ दिवस ठेवले जाते. त्यानंतर हे मिश्रण प्रति झाड १५ किलोप्रमाणे दिले जाते. त्यात शेणखतही मिसळले जाते. माती हलवून घेतात.

झाडाच्या वाढलेल्या फांद्याची छाटणी केली. सूर्यप्रकाश झाडाच्या खोडांपर्यंत पोहोचण्यासाठी विरळणी आवश्यक असते.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली जाते.

जुलै महिन्यात मुसळधार पाऊस असल्यामुळे बागांमध्ये कोणतेही काम करणे शक्य होत नाही. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जैविक फवारणी घेतली जाते.

दर महिन्यात एकदा प्रत्येक झाडाला रिंग पद्धतीने जिवामृताची मात्रा दिली जाते. त्यामुळे झाडे सशक्त होण्यास मदत होते. ही मात्रा फेब्रुवारीपर्यंत दिली जाते.

मोहोर येण्यास सुरुवात झाल्यानंतर निम आणि करंज पेंड यांची फवारणी केली. त्यामुळे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते.

सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर ओसरल्यानंतर बागेत साफसफाईच्या कामांना सुरुवात होते.

साधारण दिवाळीपर्यंत पाऊस थांबतो. त्यानंतर झाडांच्या खोडांना बोर्डो पेस्ट लावली जाते. खोडांना साधारण दोन फूट उंचीपर्यंत लावली जाते. त्यामुळे खोडकीड आणि वाळवीचा प्रादुर्भाव होत नाही.

डिसेंबर महिन्यात रासायनिक कीटकनाशकांची दुसरी फवारणी घेतली जाते.

जानेवारी महिन्यात आर्द्रता वाढल्यामुळे आंबा कलमांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत भुरीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिफारशीप्रमाणे फवारण्या घेतल्या जातात.

Mango Farm Management
Mango Production : आंब्याला मोहर उशिरा

आगामी नियोजन

झाडांना आलेल्या पहिल्या मोहोराचे संरक्षण करण्यावर विशेष भर दिला जातो. त्यासाठी सागरी शेवाळावर आधारित घटकांची फवारणी केली जाते.

फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जानेवारी महिन्यानंतर बागेत कामगंध सापळे लावण्यात येतील.

फळांची योग्य वाढ होईपर्यंत प्रतिक्षा केली जाते. यंदा उशिराने हंगाम असल्यामुळे एप्रिल अखेरीस उत्पादन भरघोस राहील असा अंदाज आहे. त्यानुसार काढणीचे नियोजन केले जाईल.

काढणीपश्‍चात तंत्रज्ञान

झाडावरून फळे काढताना तीन इंचांपर्यंत देठ राहील अशी काळजी घेतील जाते. फळ काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी १ सेंमीपर्यंत देठ ठेवतो. त्यानंतर फळावर उष्णजल प्रक्रिया करून आंबा पिकवण्यासाठी रायपनिंग चेंबरमध्ये ठेवला जातो.

उष्णजल प्रक्रियेत आंबा ५० अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात ३ मिनिटे ठेवला जातो. त्यानंतर वजनाप्रमाणे प्रतवारी केली जाते.

फळांचे आकर्षक पॅकिंग केले जाते. साधारण १ डझनाचे बॉक्स करून विक्रीसाठी पाठविले जातात.

हंगामात साधारण ९ टन हापूस आंबा उत्पादन मिळते.

मुंबई, पुणे, नाशिकसह पंजाब, दिल्ली, बेंगलोर, गुजरात इत्यादी राज्यातील मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी पाठविला जातो. ‘हॉर्टिकॉन’ या ब्रॅण्डखाली हापूस विक्री होते. यासह दरवर्षी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि दुबईमध्ये आंब्याची निर्यात केली जाते.

डझनला साधारण ८५० ते ९०० रुपये दर मिळतो. अन्य बागायतदारांच्या तुलनेत सेंद्रिय आंब्याला ३५ टक्के अधिक दर मिळत असल्याचे शेखरराव सांगतात.

आंबा विक्रीशिवाय दोन टन आंब्यावर अन्य प्रक्रिया उद्योजकाकडून प्रक्रिया केली जाते. पल्प तयार करून त्याची बाजारात विक्री केली जाते.

- शेखर विचारे, ९८२२०५६७९९

(शब्दांकन ः राजेश कळंबटे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com