Grape Advisory : द्राक्ष बागेतील भुरी रोगाचे व्यवस्थापन

बऱ्याचशा बागा फळधारणा होऊन पक्वतेच्या अवस्थेत आहेत. या बागांमध्ये भुरीच्या प्रादुर्भावामुळे मण्यांची गुणवत्ता खालावत आहे. हे टाळण्यासाठी बागेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
grapes advisory
grapes advisoryAgrowon

डॉ. सुजॉय साहा, डॉ. रत्ना ठोसर, स्नेहा भोसले

सध्या वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहेत. परिणामी बागेत भुरी रोगाचा (Powdery mildew) प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. पहाटेची थंडी आणि दिवसभर पडणाऱ्या उन्हामुळे तापमान आणि आर्द्रतेमध्ये चढउतार दिसून येत आहेत.

grapes advisory
द्राक्ष बागेतील भुरी रोगाचे करा प्रभावी व्यवस्थापन

ढगाळ वातावरण किंवा पाऊस पडून तापमान कमी झाल्याने बागेत भुरी रोगाच्या प्रसारासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. बऱ्याचशा बागा फळधारणा होऊन पक्वतेच्या अवस्थेत आहेत. या बागांमध्ये भुरीच्या प्रादुर्भावामुळे मण्यांची गुणवत्ता खालावत आहे. हे टाळण्यासाठी बागेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

grapes advisory
द्राक्ष बागेतील रोगाचे जैविक व्यवस्थापन

भुरी ः
- हा रोग इरिसिफे निकेटर या बुरशीमुळे होतो.
- रोगाचा प्रादुर्भाव वेलीच्या सर्व हिरव्या भागावर होतो. मात्र, बुरशीचे धागे वेलीच्या पृष्ठभागावर वाढतात.
- पानांच्या खालील बाजूस काळसर रंगाचे डाग दिसून येतात. सुरुवातीला पानावर पिवळसर पांढरट ठिपके व नंतर ते भुरकट होऊन संपूर्ण पान काळपट दिसते. वाढत्या प्रसारासोबत हे डाग मोठे व भुरकट रंगाचे होत जातात.
- रोगग्रस्त वेलीची वाढ खुंटून पानात विकृती येते.

grapes advisory
Grape : फिलेज : द्राक्ष बागेतील घड जिरण्याची विकृती

- फुलोरा अवस्थेत रोगाची लागण झाल्यास फलधारणा होत नाही. फळ धारणेवेळी प्रादुर्भाव झाल्यास मणी अनियमित आकाराचे होतात. काही मणी अपक्वच राहतात. मण्यांवर पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा थर येऊन मणी तडकतात व फुटतात.
- पावसाळ्याच्या दिवसांत कमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामध्ये वाऱ्यामार्फत भुरी रोगाचा प्रसार अधिक प्रमाणात होतो.
- वेलीवरील पाण्यामुळे कॅनॉपीमधील तापमान कमी होऊन आर्द्रता वाढते. अशाप्रकारे स्पोरूलेशन वाढून संसर्ग झपाट्याने वाढण्यास मदत होते.

व्यवस्थापन ः
- फळधारणेनंतर भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून आल्यास,
मेट्राफेनोन (५० टक्के एससी) ०.२५ मिलि
प्रति लिटर (२५० मिलि प्रति हेक्टर) या प्रमाणे फवारणी करावी.
- फळछाटणीनंतर ८० दिवसांपूर्वीच्या बागेत, प्रभावी नियंत्रणासाठी
मेट्राफेनोन (५० टक्के एससी) ०.२५ ग्रॅम प्रति लिटर पाणी ही फवारणी उपयुक्त ठरेल.
त्यानंतर सल्फर (८० डब्ल्यूडीजी) २ ग्रॅम अधिक सिलिकॉनयुक्त ॲडज्युएंट ०.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

फवारणीपूर्वी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांच्या संकेतस्थळावरील परिशिष्ट ५ (Annexure ५) नुसार काढणीपूर्व कालावधी अंतर पडताळून पाहणे अतिशय आवश्यक आहे.
- सोलापूर, उस्मानाबाद या सारख्या उशिरा छाटणी झालेल्या भागात भुरी नियंत्रणासाठी,
सल्फर (८० डब्ल्यूडीजी) २ ते २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे वापर करावा.
- फवारणी करताना ॲडज्युएंटचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यामुळे फवारणीचे द्रावण प्रत्येक पानावर व्यवस्थितरीत्या पसरण्यास मदत होऊन रोगाचे नियंत्रण करणे सोपे होते.
- प्रादुर्भावग्रस्त बागेत दर सात दिवसानंतर,

ॲम्पिलोमायसीस क्विसक्वलीस ५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे एक फवारणी करावी. तसेच ट्रायकोडर्मा २ ते ५ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- फवारणी करताना कव्हरेज व्यवस्थितपणे होईल याची काळजी घ्यावी. कारण घडांमध्ये भुरीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर फवारणीचे कव्हरेज नीट नसल्यास प्रभावी रोग नियंत्रण शक्य होत नाही.
- फळछाटणीनंतर ६० दिवसांपूर्वीची स्थिती असलेल्या बागेत,
(फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
ट्रायझोल वर्गातील हेक्झाकोनॅझोल (५ एससी) १ मिलि किंवा
डायफेनोकोनॅझोल ०.७ मिलि किंवा
पॉलिऑक्सिन डी झिंक सॉल्ट (५ टक्के एससी) ०.६
- छाटणीनंतर ९० दिवस पूर्ण झालेल्या बागेत,


बॅसिलस सबटिलिसची २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करणे फायद्याचे राहील.
-----------------
काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव ः
यावर्षी बागांमध्ये डिसेंबर महिन्यामध्येच काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आढळून येत आहे. काळ्या बुरशीचा लागण साधारणतः फेब्रुवारी-मार्च या महिन्यात दिसून येते. परंतु सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे याचा लवकरच प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे.
प्रादुर्भावग्रस्त बागांमधील घड,
सिलिकॉनयुक्त सरफॅक्टन्ट ०.३ मिलि प्रति लिटर
या प्रमाणे द्रावण करून प्रादुर्भाव झालेले घड धुवून काढावेत.
---------------
- डॉ. सुजॉय साहा, ९४५०३ ९४०५३
(प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com