Kharif Crop Management : खरीप पीक व्यवस्थापन

Kharif Crop : सध्या पाऊस नसल्यामुळे खरीप पिके ताणावर आहेत तर ढगाळ वातावरणामुळे पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढतोय. अशावेळी खरिप पिकात पाणी व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण कसं करावं या विषयीची माहिती पाहुया.
Maize
MaizeAgrowon

सध्या पाऊस नसल्यामुळे खरीप पिके ताणावर आहेत तर ढगाळ वातावरणामुळे पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढतोय. अशावेळी खरिप पिकात पाणी व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण कसं करावं या विषयीची माहिती पाहुया.

मका पिकाच्या तुरा येण्याच्या महत्वाच्या अवस्थेत, फुलोऱ्यात असताना आणि दाणे भरण्याच्या पिकाला पाणी द्या. पाण्याचा ताण असलेल्या ठिकाणी थायोयुरीया ०.२ टक्के म्हणजेच २ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून पीक फुलोऱ्यात येण्यापुर्वी फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे मका पिकातील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी अझाडिरेक्टिन १५०० पीपीएम म्हणजेच ५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात पावसाची उघडीप पाहून वारा शांत असताना फवारणी करा. 

Maize
Kharif Crop Management : आपत्कालीन पीक व्यवस्थापन

तूर पीक ४५ दिवसांचे झाल्यानंतर झाडाचे ५ सेंमी वरुन शेंडे खुडावेत. आवश्यकतेनुसार कोळपणी किंवा खुरपणी करावी. त्यामुळे जमिनीतील ओलावा आणि अन्नद्रव्यासाठी पिकांची एकमेकांशी स्पर्धा होणार नाही. 

मूग, उडीद पिकामध्ये सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे जर रसशोषक किडी आल्या असतील तर नियंत्रणासाठी २ मिली एमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के इसी प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी पहिली आणि ३० ते ३५ दिवसांनी दुसरी कोळपणी करावी.  

अशा प्रकारे खरीप पिकामध्ये व्यवस्थापनाचे उपाय केल्यास आहे त्या परिस्थीतीत पिकं वाचवण्यास मदत होते. 

-----------------

माहिती आणि संशोधन - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com