Brinjal Cultivation : वांगी लागवड करताना या गोष्टी लक्षात घ्या

महाराष्ट्रात तीनही हंगामात वांग्याची लागवड केली जाते. रब्बी हंगामात पेरणी सप्टेंबर अखेर करतात आणि ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये रोपांची पुनर्लागवड केली जाते.
 Brinjal Cultivation
Brinjal CultivationAgrowon

महाराष्ट्रात विविध भागात आवडीनुसार वांग्याच्या विविध (Brinjal Varieties) जाती आहेत. सांगली, सातारा भागात कृष्णाकाठची चविष्ट वांगी प्रसिद्ध आहेत. नगर, पुणे व सोलापूर भागात काटेरी किंवा डोरली वांगी जास्त पसंत केली जातात. खानदेशात भरताची वांगी हा प्रकार अधिक लोकप्रिय असून विदर्भात कमी काटे असलेली वांगीच सर्वांना आवडतात. महाराष्ट्रात तीनही हंगामात वांग्याची लागवड केली जाते. रब्बी हंगामात (Rabi Season) पेरणी सप्टेंबर अखेर करतात आणि ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये रोपांची पुनर्लागवड केली जाते. वांगी रोपांची पुनर्लागवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. 

 Brinjal Cultivation
Brinjal : वांग्यावरील रसशोषक किडी, भुरीचे नियंत्रण

जमिनीची निवड

सुपीक, मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी कसदार जमिनीमध्ये वांगी पिकाचे चांगले उत्पादन मिळते. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खते, हिरवळीची खते वापरल्यास उत्पादन वाढीस फायदा होतो. जमिनीचा सामू ५.५ ते ६.६ असल्यास पिकाची वाढ उत्तम होते.  

रोपांची पुनर्लागवड 

लागवडीपूर्वी जमिनीची उभी-आडवी नांगरट करून चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर सऱ्या वरंबे तयार कराव्यात.

रोपांची लागवड जास्त वाढणाऱ्या संकरित जातींसाठी ९० ×९० सेंमी आणि हलक्या जमिनीत कमी वाढणारी झुपक्या जातींसाठी ७५ × ७५ सेंमी अंतरावर लागवडीचे अंतर ठेवावे.

 Brinjal Cultivation
Potato Cultivation : सुधारित तंत्राने बटाटा लागवड

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन 

- लागवडीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.

- प्रति किलो बियाण्यास स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी. 

- सेंद्रिय खते लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावीत. 

- माती परीक्षणानुसार हेक्टरी १५० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश द्यावे. अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उर्वरित ७५ किलो नत्र दोन समान हप्त्यांत विभागून ३० व ४५ दिवसांनी द्यावे. खतांची मात्रा दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे.

आंतरमशागत

१५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमितपणे खुरपणी करून पिकातील तण काढून टाकावे.

लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी म्हणजेच झाडांना फुले येणाच्या सुमारास मातीची भर द्यावी. 

पाणी व्यवस्थापन 

पाण्याचे नियोजन जमीन, हंगाम व हवामानानुसार करावे.

फुले व फळे येण्याचा काळ हा अतिशय महत्त्वाचा असतो या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com